Posts

Showing posts from June, 2023

*स्वराज्य 32 शिराळा असोसिएशनने भव्य रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा पहिला मान मांगरुळच्या चिंचेश्वर स्पोर्ट ला दिला*

Image
*स्वराज्य 32 शिराळा असोसिएशनने भव्य रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा पहिला मान  मांगरुळच्या चिंचेश्वर स्पोर्ट ला दिला* *स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन अंतर्गत चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ चषक 2023 भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. चिंचेश्वर स्पोर्टच्याा माध्यमातून इतिहासात पहिल्यांदाच मुंबई या ठिकाणी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये चिंचेश्वर  स्पोर्ट मांगरूळ च्या तरुण मुलांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.अशा स्पर्धा मुंबई  यासारख्याा ठिकाणी घेणे ही सोपी गोष्ट नाही. परंतु चिंचेश्वर स्पोर्टच्या तरुण मुलांनी हे करून दाखवले आहे. विशेष बाब म्हणजे चिंचेश्वर स्पोर्ट मंगरूळ या टीम मध्ये संपूर्ण गावातील मुलांचा सहभाग आहे. आज ही मुलं एकत्र येऊन या सर्व स्पर्धेचे नियोजन करतात. आपल्या कुटुंबाचा भार घेऊन कामानिमित्त बाहेर पडलेली ही सर्व तरुण मुलं मुंबईसारख्या ठिकाणी रविवारी या दिवशी एकत्र येतात आणि खेळाच्या, स्पर्धेच्या माध्यमातून आपला पूर्ण दिवस आनंदात घालवतात. खरोखर यातून मानसिक समाधान मिळते, ते महिनेच्या पगारापेक्षा मोठी असते. रविवारी 25 जून रोजी ह...

मुसळावानी ये... जगबुडी होऊ दे’

Image
‘मुसळावानी ये... जगबुडी होऊ दे’ - मधुकर भावे चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकले. गुजरातमध्ये पावसाचा धुमाकूळ झाला. कधी नव्हे तो हाच पाऊस पुढे राजस्थानभर तीन दिवस कोसळला. संपूर्ण पावसाळ्यात राजस्थानात तीन इंचही पाऊस पडत नाही. जोधपूरमध्ये तर महापूर आला. वेधशाळांचे सगळे अंदाज चुकले. पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमध्ये छान व्यंगचित्र काढले होते... वेधशाळेने अंदाज वर्तवला होता की....  ‘आज मुंबईत तुफान पाऊस...’ कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्याने सोबत छत्री घेतल्यावर त्याची पत्नी त्याला म्हणते की, ‘छत्रीची गरज नाही...’ तो सांगतो की, ‘वेधशाळेचा अंदाज आहे, तुफान पाऊस येणार....’ पत्नी सांगते की, त्याचमुळे तुम्हाला सांगते की, ‘आज छत्रीची गरज नाही....’ त्या व्यंगचित्रासारखे वेधशाळेच्या अंदाजाचे झाले आहे. मृग कोरडा गेला. परिस्थिती बिकट होत चालली आहे. महाराष्ट्राच्या गलीच्छ राजकारणाचा एवढा धुरळा आकाशात उडालेला आहे की,  आकाशातील ढगही बहुतेक घाबरले.... आणि ते गुजरात-राजस्थानकडे सरकले. या घाणेरड्या राजकारणात झालेल्या चिखलात आपल्या पाण्याची आणखी भर पडून जास्त चिखल होऊ नये, असा त...

शिंदेसाहेब, ही जाहिरात तयार करणाऱ्याला ‘महाराष्ट्र-भूषण’ द्या!

Image
शिंदेसाहेब, ही जाहिरात तयार करणाऱ्याला ‘महाराष्ट्र-भूषण’ द्या! - मधुकर भावे सध्या महाराष्ट्र ताण-तणावाखाली आहे. राजकीय तणाव आहे. सामाजिक तणाव आहे. मानसिक तणाव आहेच... शहरांत वाहतूक कोंडी आहे. चार-चार पाच-पाच तास वाहतूक कोंडीत जीव गुदमरत आहे. प्रवास लवकर व्हावा म्हणून महामार्ग झाले. पण, या महामार्गावर एका टँकरला आग लागते... आणि मुंबईच्या बाजूला चार तास आणि पुण्याच्या बाजूला चार तास वाहतूक ठप्प राहते.... प्रवास करणारे वृद्ध, रुग्ण, डायबेटीसवाले, या सर्वांच्या हालाला सीमा नाही. नाशिकला जायला पाच-सहा तास लागताहेत.... पुण्याची स्थिती तीच झाली आहे. बाजारात महागाई आहे. बेरोजगारी तर भरपूर आहे. रोजगार नाही ते तरुण टपोरीपणाकडे वळत आहेत.... धमक्या सुरू आहेत... मधून मधून दंगली घडवल्या जात आहेत. हे सगळे का होते आहे.... कोण करते आहे.... कशाकरिता करते आहे... याची चर्चा सगळे करताहेत... सगळ्यांना उत्तरं माहिती आहेत... पण, ‘सहन करता येत नाही... आणि बोलताही येत नाही’.... इतक्या तणावाखाली लोकं आहेत.... कांद्याला भाव नाही म्हणून शेतकऱ्यांना कांदा फेकून द्यावा लागला.  टोमॅटोला भाव नाही म्ह...

*_आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कारने मधुकर भावे यांचा आज होणार सन्मान_*

Image
*_आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कारने मधुकर भावे यांचा आज होणार सन्मान_* महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक मधुकर भावे यांना 'आचार्य अत्रे पत्रकारिता' पुरस्कार जाहीर झालायं. आचार्य अत्रे यांच्या ५४ व्या स्मृतीदिना दिवशी म्हणजे आज दि.१३जून मंगळवारी हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.       पुरंदर जिल्हा पुणे येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व सासवड येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. याच कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक व कवीवर्य विठ्ठल वाघ यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार व ज्येष्ठ गायक सुधीर फडके यांना आचार्य अत्रे कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्कारांचे वितरण माजी केंद्रीय कृषिमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे शुभहस्ते होणार आहे. पुरंदर- हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय जगताप कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. खासदार सुप्रियाताई सुळे, उद्योजक विठ्ठल शेठ मणियार, ज्येष्ठ विधीतज्ञ राजेंद्र पै यांच्या प्रमुख उपस्थितीत...

आचार्य अत्रे यांना ‘महाराष्ट्र-भूषण’ पुरस्कराने सन्मानित करा

Image
आचार्य अत्रे यांना ‘महाराष्ट्र-भूषण’ पुरस्कराने सन्मानित करा - मधुकर भावे १३ जून १९६९ संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी १९४६ च्या बेळगाव साहित्य संमेलनापासून आवाज उठवणारे आणि १९५४ ते १९६९ पर्यंत सतत १५ वर्षे आपल्या वाणी आणि लेखणीने महाराष्ट्राचा जागता पहारेकरी म्हणून ज्यांनी अखंड जागल्याची भूमिका घेतली ते आचार्य अत्रे १३ जून १९६९ रोजी महाराष्ट्राला सोडून गेले. मंगळवारी त्यांची ५४ वी पुण्यतिथी... संयुक्त महाराष्ट्राचे सगळे राज्य आणि शेवटी ‘महाराष्ट्र- राज्य’ हे नाव ज्यांच्या शेवटच्या तडाख्यामुळे मिळाले... नाहीतर हे राज्य ‘मुंबई राज्य’ झाले असते... त्या आचार्य अत्रे यांना महाराष्ट्राने काय दिले? महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र भूषण’ या सन्मानाने त्यांना कधीच पुरस्कृत करायला हवे होते. पण, ‘मरणोत्तर पुरस्कार द्यायचा नाही’, असा निर्णय त्यावेळी सरकारने घेतला... मात्र २००८ साली नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेला.. मग आता आचार्य अत्रे यांना पुरस्कर देण्यासाठी सरकारला कोणती अडचण आहे? आम जनतेची तर मागणी आहे की, संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणारे आचार्य अत्रे,...

कविता हे परिवर्तनाचे शस्त्र आहे - कवी प्रकाश नाईकबेलेवाडी येथे कवी संमेलन उत्साहात पार पडले*...

Image
.*कविता हे परिवर्तनाचे शस्त्र आहे - कवी प्रकाश नाईक बेलेवाडी येथे कवी संमेलन उत्साहात पार पडले*... *मनोजकुमार मस्के ,मांगरूळ* कवी होणं एवढं शक्य नाही अनंत कळा सहन कराव्या लागतात, काट्यावरून चालावं लागत असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी प्रा.प्रकाश नाईक यांनी केले. बेलेवाडी ,३२ शिराळा येथे वारणेचा वाघ साहित्य मंच'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कवी सम्मेलनात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रकाश नाईक पुढे बोलताना म्हणाले की, "वारणेचा वाघ्" म्हणजे हातकणंगले तालुक्यातील सत्तू भोसले  त्यांनी कितीतरी आयाबहिणीचे संसार वाचवले अब्रू वाचवली आणि त्याना शब्दांच्या माध्यमातून अजरामर करण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी केलं आणि ह्या वारणेचा आवाज जर बुलंद करण्याचं काम ह्या मंच'च्या माध्यमातून होत असेल तर निश्चीतपणाने आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. प्रारंभी या कविसंमेलनाचे उदगाटन प्रसिद्ध कवी श्री.आनंदहरी यांनी केले व सुप्रसिद्ध कवी श्री.वसंत पाटील यांनी प्रतीमापुजन केले रवि बावडेकर,दिनेश हसबनीस,मेहबुब जमादार,धर्मवीर पाटील,विक्...