*स्वराज्य 32 शिराळा असोसिएशनने भव्य रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा पहिला मान मांगरुळच्या चिंचेश्वर स्पोर्ट ला दिला*
*स्वराज्य 32 शिराळा असोसिएशनने भव्य रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा पहिला मान मांगरुळच्या चिंचेश्वर स्पोर्ट ला दिला*
*स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन अंतर्गत चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ चषक 2023 भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. चिंचेश्वर स्पोर्टच्याा माध्यमातून इतिहासात पहिल्यांदाच मुंबई या ठिकाणी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ च्या तरुण मुलांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.अशा स्पर्धा मुंबई यासारख्याा ठिकाणी घेणे ही सोपी गोष्ट नाही. परंतु चिंचेश्वर स्पोर्टच्या तरुण मुलांनी हे करून दाखवले आहे. विशेष बाब म्हणजे चिंचेश्वर स्पोर्ट मंगरूळ या टीम मध्ये संपूर्ण गावातील मुलांचा सहभाग आहे. आज ही मुलं एकत्र येऊन या सर्व स्पर्धेचे नियोजन करतात. आपल्या कुटुंबाचा भार घेऊन कामानिमित्त बाहेर पडलेली ही सर्व तरुण मुलं मुंबईसारख्या ठिकाणी रविवारी या दिवशी एकत्र येतात आणि खेळाच्या, स्पर्धेच्या माध्यमातून आपला पूर्ण दिवस आनंदात घालवतात. खरोखर यातून मानसिक समाधान मिळते, ते महिनेच्या पगारापेक्षा मोठी असते. रविवारी 25 जून रोजी ह्या स्पर्धा नवी मुंबई येथे घेण्यात आल्या. ही स्पर्धा सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू होत्या. पूर्ण दिवस पाऊस चालू होता. तरीसुद्धा पावसाचा आनंद लुटत या स्पर्धेमध्ये शिराळा तालुक्यातील 24 संघ खेळले. या स्पर्धेसाठी चिंचेश्वर स्पोर्टच्या मुलांचा उत्साह खूप होता. या स्पर्धेचे आयोजन चिंचेश्वर स्पोर्ट ने कमी कालावधीतच केले होते.या स्पर्धेमध्ये येणाऱ्या मान्यवरांचे सत्कार देखील चिंचेश्वर स्पोर्ट ने केले चिंचेश्वर स्पोर्ट ने काल स्पर्धेदरम्यान अनेकांचे बर्थडे सेलिब्रेशन देखील केले.चिंचेश्वर स्पोर्टच्या माध्यमातून ठेवलेल्याा स्पर्धेचा आनंद सर्व क्रिकेट प्रेमींनी लुटला यामध्ये प्रथम क्रमांक रांजणवाडी तर द्वितीय क्रमांक वाकाईवाडी आणि तृतीय क्रमांक चिंचोली अशाप्रकारे चिंचेश्वर स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा्धा संपन्न झाली या स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य सचिन मस्के (मुंबई पोलीस) आणि सर्वच चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ यांनी केले*
*ही स्पर्धा Youtube च्या माध्यमातून. लाईव्ह सुरू होत्या youtube च्या माध्यमातून च्या माध्यमातून सर्व तालुक्यातील क्रिकेट प्रेमींनी लाईव्ह बघून आनंद घेतला*
Comments
Post a Comment