*_आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कारने मधुकर भावे यांचा आज होणार सन्मान_*

*_आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कारने मधुकर भावे यांचा आज होणार सन्मान_*
महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक मधुकर भावे यांना 'आचार्य अत्रे पत्रकारिता' पुरस्कार जाहीर झालायं. आचार्य अत्रे यांच्या ५४ व्या स्मृतीदिना दिवशी म्हणजे आज दि.१३जून मंगळवारी हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
      पुरंदर जिल्हा पुणे येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व सासवड येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. याच कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक व कवीवर्य विठ्ठल वाघ यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार व ज्येष्ठ गायक सुधीर फडके यांना आचार्य अत्रे कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्कारांचे वितरण माजी केंद्रीय कृषिमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे शुभहस्ते होणार आहे. पुरंदर- हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय जगताप कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. खासदार सुप्रियाताई सुळे, उद्योजक विठ्ठल शेठ मणियार, ज्येष्ठ विधीतज्ञ राजेंद्र पै यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. आज हा कार्यक्रम सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात सकाळी दहा वाजता होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*