कविता हे परिवर्तनाचे शस्त्र आहे - कवी प्रकाश नाईकबेलेवाडी येथे कवी संमेलन उत्साहात पार पडले*...
.*कविता हे परिवर्तनाचे शस्त्र आहे - कवी प्रकाश नाईक
बेलेवाडी येथे कवी संमेलन उत्साहात पार पडले*...
*मनोजकुमार मस्के ,मांगरूळ*
कवी होणं एवढं शक्य नाही अनंत कळा सहन कराव्या लागतात, काट्यावरून चालावं लागत असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी प्रा.प्रकाश नाईक यांनी केले. बेलेवाडी ,३२ शिराळा येथे वारणेचा वाघ साहित्य मंच'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कवी सम्मेलनात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी प्रकाश नाईक पुढे बोलताना म्हणाले की, "वारणेचा वाघ्" म्हणजे हातकणंगले तालुक्यातील सत्तू भोसले त्यांनी कितीतरी आयाबहिणीचे संसार वाचवले अब्रू वाचवली आणि त्याना शब्दांच्या माध्यमातून अजरामर करण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी केलं आणि ह्या वारणेचा आवाज जर बुलंद करण्याचं काम ह्या मंच'च्या माध्यमातून होत असेल तर निश्चीतपणाने आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
प्रारंभी या कविसंमेलनाचे उदगाटन प्रसिद्ध कवी श्री.आनंदहरी यांनी केले व सुप्रसिद्ध कवी श्री.वसंत पाटील यांनी प्रतीमापुजन केले रवि बावडेकर,दिनेश हसबनीस,मेहबुब जमादार,धर्मवीर पाटील,विक्रम जाधव,उपसरपंच- अलका बसरे आदी मान्यवरांच्या उपस्थीतीत पार पडले.
यावेळी प्रकाश नाईक पुढे बोलताना म्हणाले की ,कविता हे परिवर्तनाचे शस्त्र आहे. या शस्त्राचा वापर करत कवितेतून दुःखितांच्या दुःख -व्यथांना कवींनी वाचा फोडली पाहिजे यावेळी त्यांनी"कविता आवाज असते माणसाचा, सार असते प्रेमाचा! कविता आशय असते समतेचा आणि काळ असते वैराचा!"ही कविता त्यांनी सादर केली.यावेळी आनंदहरी,वसंत पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान यावेळी पार पडलेल्या बहारदार खुल्या कविसंमेलनात कृष्णांकुर,मनिषा रायजादे,शिवराज पाटील,वसंत पाटील,धर्मवीर पाटील,मेहबुब जमादार,आनंहरी,विक्रम जाधव,संजय नायकवडी,नथुराम कुंभार,गुलाब मोहीते,सुवर्णा मिरजकर,वनिता जांगळे,सायली जाधव,भारती पाटील,आर.बी.कोकाटे,पुनम सावंत,अक्षय कुंभार,सुनिता कुलकर्णी,सुरेश थोरात,दिलीप गीरीगोसावी यांचेसह तीसहुन अधीक कविंनी शेतकरी,आई,पाऊस,प्रेम,राजकारण अशा विविध विषयांवर कविता सादर केल्या.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन - सौ.वनिता जांगळे यांनी केले तर शेवटी आभार - विक्रम जाधव यांनी मानले.या संमेलनावेळी शिवाजी पाटील,सुदाम पाटील,अतुल खेडकर या शिक्षकांचा उत्तम जाधव ,अंकुश जाधव,दिलीप जाधव,माजी सौनिक - गोरख बसरे,युवा उद्योजक-पंकज जाधव,राजु बसरे ग्रामस्थांच्यावतीने सन्मान करण्यात आला
तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ओमकार जाधव,अमर जाधव,रणजित खोत,महेश जाधव व समस्त बेलेवाडी ग्रामस्थांनी परीश्रम घेतले .
या कार्यक्रमासाठी महिला,पुरुष,साहीत्यरसीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
Comments
Post a Comment