Posts

Showing posts from September, 2021

मा भिमराव पाटील (सरपंच) वाढदिवस विशेष लेख*.....

Image
*मा भिमराव पाटील (सरपंच) वाढदिवस विशेष लेख*..... ..........................     शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली गावचे सुपुत्र, संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुका अध्यक्ष *मा. भिमराव पाटील* यांचा आज वाढदिवस .................................  *✍️लेखन- पै अशोक सावंत पाटील* सोंडोलीकर .................................  शाहूवाडी तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून भीमराव पाटील यांच्याकडे पाहिले जाते अगदी कमी वयातच राजकारणात आपली छाप पाडणारे, आपले अस्तित्व निर्माण करणारे *राजकीय कर्ण म्हणजे भिमराव पाटील होय*.......         लहानपणापासूनच भिमराव पाटील यांना शिक्षणाची भारी आवड, पहिले ते दहावी पर्यंत आम्ही एकञच शिक्षण घेतले त्या नंतरचे उच्च शिक्षण त्यांनी कोकरूड येथे घेतले. त्यांच्या बरोबर शिक्षण घेत असताना आम्हाला बरेच अनुभव आले.     भिमराव पाटील यांना राजकारणात आणण्याचे खर्या अर्थाने कोणाचे काम असेल तर ते म्हणजे त्यांच्या एकदम जवळचे, जिव्हाळ्याचे सोंडोली गावचे  *दिवंगत नेते कै. मारुती सावंत यांचा*...... त्यांना राजका...

*चांगली बातमी! 10 व्या हप्त्यात शेतकऱ्यांना 2000 ऐवजी 4000 रुपये मिळणार, फक्त हे काम करा*...….

Image
Pm Kisan : *चांगली बातमी! 10 व्या हप्त्यात शेतकऱ्यांना 2000 ऐवजी 4000 रुपये मिळणार, फक्त हे काम करा* पंतप्रधान किसान सन्मान योजना   नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पण प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, मोदी सरकार शेतकऱ्यांना उपलब्ध असलेली ही सुविधा दुप्पट करण्याचा विचार करीत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 12000 रुपये मिळू शकतात. *सरकारने या योजनेच्या जुन्या व्यवस्थेत काही बदल केलेत*. आता फक्त त्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळेल, ज्यांच्या नावावर शेत असेल. म्हणजेच, पूर्वीप्रमाणेच ज्यांना वडिलोपार्जित जमिनीत वाटा आहे, त्यांना यापुढे या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. जर तुमच्या नावावरसुद्धा शेत असेल तर हे काम त्वरित करा अन्यथा तुमचा पुढचा हप्ता अडकू शकतो. *ही आवश्यक माहिती द्यावी लागेल* 2019 मध्ये सुरू झालेल्या योजनेमध्ये भूतकाळात काही त्रुटी आढळल्या होत्या, ज्या सरकारने दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. या योजनेत पारदर्शकता आणण्...

जेव्हा मुस्लिम भगिनी दीप प्रज्वलन करुन मराठी कविता संग्रहाच प्रकाशन होत.....

Image
मधुकर भावे रविवार दिनांक २६ सप्टेंबर २0२१. एक आगळा-वेगळा दिवस. आजपर्यंत पुस्तक प्रकाशनाच्या अनेक कार्यक्रमांना गेलो. कार्यक्रमात वक्ता म्हणून सहभागी झालो. त्यानंतर त्या पुस्तकांंवर लिहीलं. किती कार्यक्रमांना गेलो, लक्षातही राहील नाही. रविवारचा कार्यक्रम मात्र कित्येक दिवस असा मनात कोरलेला राहील.... एक मुस्लिम भगिनी तिच्य मराठी काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना अन्य चार मराठी पुस्तकांची प्रकाशने होत आहेत... सर्व हिंदु-मुस्लिम भगिनी बहिणी-बहिणीप्रमाणे हातात हात घालून दीपप्र्रजवलन करुन समईच्या वाती उजळताहेत... समारंभाचं ठिकाण आहे पुण्यातील मराठी साहित्य परिषदेचे सभागृह. त्या सभागृहात १00 फोटो आहेत. त्या फोटोंमध्ये  टिळक आहेत, नरसिंह चिंतामण केळकर आहेत, अच्युतराव कोल्हटकर आहेत, कुसुमाग्रज आहेत. पु.ल. देशपांडे आहेत, पु.शि.रेगे आहेत, आजवरच्या मराठी साहित्य संमेलनाचे सर्व अध्यक्ष छायाचित्राच्या रुपाने हजर आहेत आणि त्या सभागृहात ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते पाच मराठी पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. त्यातील चार मराठी पुस्तके मुस्लिम भग...

कमी वयातच मोठी जबाबदारी पेलणारे विराट मनाचे विराज नाईक (दादा)...…...

Image
शिराळा तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून विराजदादा नाईक यांच्याकडे पाहीले जाते. अत्यंत शांत, संयमी, आणि अभ्यासू व्यक्तीमत्व विराज नाईक यांच्याकडे आहे. कमी वयातच त्यांनी विराज इंडस्ट्रीची जबाबदारी घेऊन ती यशस्वीपणे पार पाडली. आज विराज इंडस्ट्री च्या माध्यमातुन अनेक उत्पादने निर्माण करून ती जगाच्या बाजारपेठेत विकणे ही फार मोठी कसरत असताना देखील विराजदादांनी ती यशस्वी करून दाखवली.  प्रत्येकाशी आपुलकीने बोलणे, कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकुन घेणे, चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करणे आशा विविध गुणांच्या मुळे विराजदादा प्रतयेकाला आपलेसे वाटतात.            पुणे येथील विश्वकर्मा ईन्सि्टट्युट आॅफ टेक्नॉलॉजी येथे विराजदादांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली . त्यानंतर लंडन येथे नाॅटिंगहॅम युनिव्हर्सिटी येथुन एमबीए बिझनेस मॅनेजमेंटची पदवी प्राप्त केली .  याच शिक्षणाच्या भरवशावर व विराजदादांच्या मेहनतीवर वडील मानसिंगराव नाईक भाऊ यांनी विराज इंडस्ट्रीची जबाबदारी विराजदादा नाईक यांच्यावर सोपविली. आज विराजदादा यांच्या मार्गदर्शनाखाली विरा...

दोस्ती च्या दुनियेतला दिलदार मित्र पै विजय मस्के वाढदिवस अभिष्टचिंतन*.......

Image
*दोस्ती च्या दुनियेतला दिलदार मित्र पै विजय मस्के वाढदिवस अभिष्टचिंतन*.......  •••••••••••••••••••••   मांगरूळ गावचे सुपुत्र पै.. विजय मस्के यांचा आज वाढदिवस,      आपले आयुष्य काही लोकं आपल्या कार्यकौशल्याच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर निर्माण करत असतात, तर काही लोकं स्वकर्तृत्वावर आपले आयुष्य सुखकर बनवत असतात, तर काहीजन नशिबाला दोष देत आपले आयुष्य मातीमोल करत असतात, असेच आज स्वतः ला सिद्ध आणि निर्माण करणारे *पै विजय मस्के यांचा आज वाढदिवस आहे*.. नातं तुझं माझं रक्ताचं नाही पण या जन्मी तुटेल एवढही कच्च ही नाही. विजय तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.          खरं सांगायचं झालं तर मैत्री म्हणजे काय ते त्याच्या कडून शिकावं, आपल्या मित्राला कसलीही अडचण आली तर फोन येताच हातातील काम बाजूला सारून मित्रासाठी एकमेव वेळ देणारा मित्र म्हणजे विजय मस्के.....     पहिल्या पासुनच कुस्ती चा वारसा असणाऱ्या, विजयला लहानपणापासून कुस्ती खेळाचे वेड, शाळा सुटली की तालमीत जाणे हा त्याचा छंद, लहान पणी आजुबाजूच्या गावमैदानात कुस्त्या त...

विक्रिकर निरिक्षक ते पोलिस उपायुक्त प्रवास* *कुस्तीची परंपरा वडीलोपर्जित जोपासनारे महान खेळाडू मा. पी.आर.पाटील साहेब (IPS)* *यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*.

Image
*विक्रिकर निरिक्षक ते पोलिस उपायुक्त प्रवास* *कुस्तीची परंपरा वडीलोपर्जित जोपासनारे महान खेळाडू मा. पी.आर.पाटील साहेब (IPS)* *यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*. ....................................................................... शाहुवाडी तालुक्यातील एक छोटेसे गाव सरूड याच गावातील त्या काळातील तुफानी पैलवान राजाराम पाटील (दादा) यांचे सुपुत्र पोलिस अधीक्षक मा. पी.आर. पाटील साहेब (IPS). घरचा तसा वारसा कुस्तीचा कारण वढलोपर्जीत चालत आलेली परंपरा आज सुद्धा या घराने कायम जपली आहे. साहेब गावच्याच जि.प. शाळेत शिकले.  पुढील शिक्षण त्यांनी मलकापूर येथील विद्यालयात घेतले.  पी.आर.पाटील साहेब उत्तम चित्र रेखटतात पंढरपुरचा विठूराया, विर बजरंगबली, शाहु,फुले,आंदळकर वस्ताद अशि शेकडो चित्र हुबेहुब त्यांनी रेखटली आहेत‌. त्याची रेखाटलेली चित्रे नुसती पाहतच बसावं असं वाटतं. प्रत्येक चित्रात भाव पाहायला मिळतात. साहेबांनी कोल्हापूरात रिक्षा चालवून आपले पुढील शिक्षण पूर्ण केले आहे. गरीबीचे चटके त्यांनी सहन केले आहेत.त्यामुळे ते प्रत्येक सामाजीक कामात पुढे असतात. गरजवंतांना नेहमी मदत...

संजय गांधी निराधार योजना समिती शाहुवाडी, तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना मा आमदार सत्यजित पाटील (आबा) यांच्या प्रमुख उपस्थितीत 'मंजुरी पत्र' वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*.

Image
*संजय गांधी निराधार योजना समिती शाहुवाडी, तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना मा आमदार सत्यजित पाटील (आबा) यांच्या प्रमुख उपस्थितीत 'मंजुरी पत्र' वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*...  .........................  ✍️ *लेखन-पै अशोक सावंत/पाटील* सोंडोलीकर .............................     मंगळवार दि ७/९/२०२१ रोजी हा कार्यक्रम तालुक्यातील रेठरे वारणा, शाहुवाडी, करंजफेण आणि बांबवडे अशा चार ठिकाणी संजय गांधी निराधार योजना समिती *शाहुवाडी तालुका अध्यक्ष , सोंडोली गावचे सरपंच भिमराव पाटील* आणि या समिती मधील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी, यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील लाभार्थींना याचा चांगलाच फायदा झाला.     खासकरुन शाहुवाडी तालुक्याचे, *मा आमदार मा सत्यजित पाटील आबा, सभापती मा.विजयराव खोत* यांनी या लाभार्थी लोकांच्या पर्यंत ही योजना पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.     मा भिमराव पाटील यांची गेल्या मार्च महिन्यात या संजय गांधी निराधार योजना समिती वर अध्यक्ष म्हणून निवड झाली, आणि पाचंच महिन्यात तालुक्यातील १८० गरजु, वंचित,पिडीत,गर...