संजय गांधी निराधार योजना समिती शाहुवाडी, तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना मा आमदार सत्यजित पाटील (आबा) यांच्या प्रमुख उपस्थितीत 'मंजुरी पत्र' वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*.
*संजय गांधी निराधार योजना समिती शाहुवाडी, तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना मा आमदार सत्यजित पाटील (आबा) यांच्या प्रमुख उपस्थितीत 'मंजुरी पत्र' वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*...
.........................
✍️ *लेखन-पै अशोक सावंत/पाटील* सोंडोलीकर
.............................
मंगळवार दि ७/९/२०२१ रोजी हा कार्यक्रम तालुक्यातील रेठरे वारणा, शाहुवाडी, करंजफेण आणि बांबवडे अशा चार ठिकाणी संजय गांधी निराधार योजना समिती *शाहुवाडी तालुका अध्यक्ष , सोंडोली गावचे सरपंच भिमराव पाटील* आणि या समिती मधील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी, यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील लाभार्थींना याचा चांगलाच फायदा झाला.
खासकरुन शाहुवाडी तालुक्याचे, *मा आमदार मा सत्यजित पाटील आबा, सभापती मा.विजयराव खोत* यांनी या लाभार्थी लोकांच्या पर्यंत ही योजना पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
मा भिमराव पाटील यांची गेल्या मार्च महिन्यात या संजय गांधी निराधार योजना समिती वर अध्यक्ष म्हणून निवड झाली, आणि पाचंच महिन्यात तालुक्यातील १८० गरजु, वंचित,पिडीत,गरजु लोकांच्या पर्यंत ही योजना पोहचवून त्यांच्या येणाऱ्या पुढील आयुष्याला हातभार लावण्याचे एक मोठे काम केले आहे.
म्हणूनच मी याठिकाणी म्हणतो, नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उसने मिळत नाही ते स्वतः कमवावे लागते.
कोरोणा आणि इतर कारणाने शेकडो प्रस्ताव तालुक्यात प्रलंबित होते.सन्माननिय अध्यक्षांनी अधिकार्या मार्फत पाठपुरावा करून संजय गांधी निराधारचे काही प्रस्ताव, श्रावण बाळ योजनेचे काही प्रस्ताव, इंदिरा गांधी योजनेचे काही प्रस्ताव असे एकूण १८० प्रस्ताव मंजूर करुन लाभार्थ्यांना या कार्यक्रमात मंजुरी पत्र देण्यात आले. *निराधाराला आधार देण्याचे काम आपल्या समितीच आहे हे अध्यक्ष भिमराव पाटील यांनी सिद्ध केलेलं आहे* याही पुढे जाऊन जास्तीत जास्त प्रस्ताव कसे तालुक्याला प्राप्त होतील आणि तालुक्यातील एकही लाभार्थी शासनाच्या या योजनापासून वंचित राहणार नाही याकडे ते आपल्या सर्वांच्या मदतीनं लक्ष देणार आहेत. *या योजनांची गावपातळीवर जाहिरात करून या योजनेसाठी लाभार्थी कसे पात्र होतील याकडेही ते समितीच्या सर्व सदस्यांच्या आणि गावपातळीवरील कार्यकर्त्याच्या सहकार्याने प्रयत्नशील राहणार आहेत*
या चारही ठिकाण च्या कार्यक्रमात *मा. आमदार सत्यजित पाटील यांच्या समवेत बांधकाम व आरोग्य सभापती मा. हंबीरराव पाटील बापु, सभापती मा विजयराव खोत,संजय गांधी निराधार योजना समिती चे अध्यक्ष मा भिमराव पाटील, उपसभापती मा दिलीप पाटील, पंचायत समिती सदस्य,मा जालिंदर पाटील दादा* जि प सदस्य मा अमर पाटील, शेतकरी कामगार नेते मा भाई भरत पाटील,तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व योजना समिती चे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते.
______________________
धन्यवाद
*पै अशोक सावंत/पाटील* कुस्ती संघटक
*कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य*
अध्यक्ष शाहुवाडी तालुका
मो.9702984006
Comments
Post a Comment