जेव्हा मुस्लिम भगिनी दीप प्रज्वलन करुन मराठी कविता संग्रहाच प्रकाशन होत.....
मधुकर भावे
रविवार दिनांक २६ सप्टेंबर २0२१. एक आगळा-वेगळा दिवस. आजपर्यंत पुस्तक प्रकाशनाच्या अनेक कार्यक्रमांना गेलो. कार्यक्रमात वक्ता म्हणून सहभागी झालो. त्यानंतर त्या पुस्तकांंवर लिहीलं. किती कार्यक्रमांना गेलो, लक्षातही राहील नाही. रविवारचा कार्यक्रम मात्र कित्येक दिवस असा मनात कोरलेला राहील.... एक मुस्लिम भगिनी तिच्य मराठी काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना अन्य चार मराठी पुस्तकांची प्रकाशने होत आहेत... सर्व हिंदु-मुस्लिम भगिनी बहिणी-बहिणीप्रमाणे हातात हात घालून दीपप्र्रजवलन करुन समईच्या वाती उजळताहेत... समारंभाचं ठिकाण आहे पुण्यातील मराठी साहित्य परिषदेचे सभागृह. त्या सभागृहात १00 फोटो आहेत. त्या फोटोंमध्ये टिळक आहेत, नरसिंह चिंतामण केळकर आहेत, अच्युतराव कोल्हटकर आहेत, कुसुमाग्रज आहेत. पु.ल. देशपांडे आहेत, पु.शि.रेगे आहेत, आजवरच्या मराठी साहित्य संमेलनाचे सर्व अध्यक्ष छायाचित्राच्या रुपाने हजर आहेत आणि त्या सभागृहात ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते पाच मराठी पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. त्यातील चार मराठी पुस्तके मुस्लिम भगिनींनी लिहीलेली आहेत आणि एक मराठी पुस्तक मराठी भगिनीच आहे. व्यासपीठावरचा फलक दर्शवतो आहे की,.. ‘मुस्लिम मराठी साहित्य संमेलन’ कार्यक्रमाला फार गर्दी नाही. पण निवडक दर्दी आहेत आणि या पाच लेखिकांचा उत्साह पाहून केवळ मराठी साहित्याचीच नव्हे तर राष्ट्रीय एकात्मतेची वेगळी ग्वाही या भगिनींच्या उपस्थितीत मिळते आहे. शुध्द मराठी कस बोलाव, या प्रत्येक भगिनीच्या भाषणातून वाक््या वाक्याला जाणवतंय आणि कार्यक्रम रंगत जातोय.
‘रंग उन्हाचे’... हा कविता संग्रह आहे श्रीमती दिलशाद सय्यद यांचा. या भगिनीचा हा पहिला मराठी कविता संग्रह. संग्रहाला प्रस्तावना आहे सुभाष सोनावणे यांची. ज्येष्ठ साहित्यिक लहू कानडे यांच्या शुभेच्छा आहेत. अगस्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील शिंदे यांच्याही शुभेच्छा आहेत, प्रशांत वाघ यांनी शुभेच्छा पाठवल्या आहेत. ही कवयित्री नगर जिल्ह्यातल्या अकोले येथे शिक्षिका आहे. माझ्या वडिलांचा माणुसकीचा वारसा घेऊ न लिहीते आहे असे तिने सुरुवातीलाच सांगितले आहे. मराठी भाषेवरच तिच प्रेम कवितेच्या शब्दपेक्षा मनाला भरभरु जाणवणारं आहे. ही कवयित्री नगर जिल्ह्यातल्या कळसुबाईच शिखर आपल्या कवितांनी गाजविल याची पहिल्याच कविता संग्र्रहात जणू ती ग्वाही देतेयं.
दिलशादचा कविता संग्रह वाचला. तिच पूर्ण नाव दिलशाद यासिन सय्यद. तिच सामाजिक भानं जबरदस्त आहे. रोजच्या वर्तमानपत्रात महिलांवरील अत्याचाराच्या बातमी वाचून पेटून उठलेली दिलशाद लिहतेय...
आपल्या संरक्षणाची गुढी
तुच आता उभार
अन्याय, अत्याचाराचा
करु समर्थपणे प्रतिकार...
खांद्याला खांदा लावून
लढू अस्तित्वाची लढाई
स्त्रिया या देशाची आर्धी शक्ती
हातभाराला तिची कमाई
आणि मग ती संतापाने लिहीते आहे.
पिसाळलेले लांडगे समाजात
मोकाट सुटले आहेत
वाघीण होवून त्यांचा बंदोबस्त
आम्हालाच करायचय
आणि ही भगिनी लिहीते आहे....
ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले
सर्वांना बरोबर घेवून शिवबांनी
हिंदवी स्वराज्य निर्माण केले
दिलशादचे सामाजिक भान फार जबरदस्त आहे. आज कामगारांचे होणारे शोषण तिच्या नजरेतून सुटलेले नाही आणि मग ती लिहीते आहे..
टिचभार पोटासाठी जीवाची किती रांगोळी
दाम कमी, काम जास्त
होते उपाशी होळी
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नगर जिल्ह््यातल्या या कवयित्रीला नेवाश्याला ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहीली याची नेमकी आठवण आहे. आणि पंढरपूरच्या वारीचे मृदंग तिच्या कवितेत दुमदुमत आहेत, ती म्हणते...
पावले चालती पंढरीची वाट
टाळ मृदूंगांच्या गजरात
सुख आणि दु:ख विसरुन
ज्ञानोबा, तुकोबा वैष्णव भिजवती पावसात
दिलशादने एकूण ६५ कविता लिहील्या. या कविता लिहीत असताना छत्रपती शिवाजी महाराज, पराक्रमी संभाजी राजे हे तिचे कवितेचे मोठे विषय होतात. संभाजी राजांबद्दल ती लिहीते..
शिवबाच्या पोटी जन्मले
वीर रत्न शौर्यगाथेचे
छातीवर वार झेलून
रणशिंग फुंकले आव्हानाचे
दिलशादने निसर्गावरही छान कवित्या लिहील्या आहेत. ओलाचिंब पाउस, हिरवे सोने, पाऊ स-वारा अशा कवितातून तिच निसर्ग प्रेम व्यक्त झालयं. पण त्याहीपेक्षा माय मराठीवर तिच मनापासून किमी प्रेम आहे. त्यामुळे तिच्या पहिल्या कविता संग्रहात काही ओळींमध्ये शब्द ओबड धोबड असतील. अनुभवातून ती अधिक चांगल लिहीत पण, शब्दापेक्षा मराठीच प्रेम, देशावरच प्रेम, शिवबाचा अभिमान या सगळ्या तिच्या भावना थक्क करणाºया वाटतात.
माय मराठी कवितेत ती म्हणते....
‘माझ्या मराठीची काय..
वर्णावी सांगा महती
मनामनातील कोपºयात
ती आहे सांगाती..
महाराष्ट्राच्या मातीत
बीज अंकुरलेले मराठीचे
भजन, कीर्तन, भारुडे
बीजारोहण संस्कृतीचे’
आणि हीच दिलशाद अतिरेक्यांवर तुटून पडलेली आहे...
भ्याड दहशतवाद्यांनी
पाठीवर केला वार...
अनेक संसार उद्ध्वस्त करुन
केला माणूसकीवर प्रहार
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची
बदला घेण्याची वेळ आली.
सर्जिकल स्ट्राईक करुन
जवानांनी चुणूक दाखवली..
दिलशादच्या कवितांपेक्षाही देशाबद्दलच्या तिच्या भावना आणि मराठी बद्दलचे तिचे पे्रम कोणत्याही तागडीत तोलता येणार नाही. हे सर्व कुटूंब देशप्रेमी आणि मराठी प्रेमी आहे. दिलशादची मोठी बहिण शबाना शेख ही मुंबईच्या डोंगरी पोलिस स्टेशनची ज्येष्ठ पोलीस निरीक्षक आहे आणि गेल्या काही महिन्या डोंगरी भागातील १२ कोटीचे जप्त करुन तिनं १0 गुन्हेगारांना गजाआड केलं आहे, असं हे कुुुटूंब.
याच कार्यक्रमात अनिसा सिंकदर शेख यांच्या ‘सांगाती’ या चारोळी संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले त्याचप्रमाणे ‘फातिमाबी शेख’, संवाद हृदयाशी, तीन घडींचा डाव या पुस्तकांची प्रकाशने करण्यात आली. तीन घडींचा डाव हे पुस्तक प्रा. रेखा सांगारे यांनी लिहीलं आहे.
हा कार्यक्रम अनेक दिवस लक्षात राहील असा झाला.
Comments
Post a Comment