दोस्ती च्या दुनियेतला दिलदार मित्र पै विजय मस्के वाढदिवस अभिष्टचिंतन*.......
*दोस्ती च्या दुनियेतला दिलदार मित्र पै विजय मस्के वाढदिवस अभिष्टचिंतन*.......
•••••••••••••••••••••
मांगरूळ गावचे सुपुत्र पै.. विजय मस्के यांचा आज वाढदिवस,
आपले आयुष्य काही लोकं आपल्या कार्यकौशल्याच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर निर्माण करत असतात, तर काही लोकं स्वकर्तृत्वावर आपले आयुष्य सुखकर बनवत असतात, तर काहीजन नशिबाला दोष देत आपले आयुष्य मातीमोल करत असतात, असेच आज स्वतः ला सिद्ध आणि निर्माण करणारे *पै विजय मस्के यांचा आज वाढदिवस आहे*..
नातं तुझं माझं रक्ताचं नाही
पण या जन्मी तुटेल
एवढही कच्च ही नाही.
विजय तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
खरं सांगायचं झालं तर मैत्री म्हणजे काय ते त्याच्या कडून शिकावं, आपल्या मित्राला कसलीही अडचण आली तर फोन येताच हातातील काम बाजूला सारून मित्रासाठी एकमेव वेळ देणारा मित्र म्हणजे विजय मस्के.....
पहिल्या पासुनच कुस्ती चा वारसा असणाऱ्या, विजयला लहानपणापासून कुस्ती खेळाचे वेड, शाळा सुटली की तालमीत जाणे हा त्याचा छंद, लहान पणी आजुबाजूच्या गावमैदानात कुस्त्या त्याने अनेक वेळा केल्या आहेत. त्यानंतर मुंबई मध्ये *महात्मा फुले व्यायामशाळेत त्यांनी प्रवेश घेतला, एक चांगला पैलवान म्हणून नावारूपाला आला*. कालांतराने नोकरीच्या नादात कुस्ती सुटली पण, कुस्ती खेळावर असणारी आत्मियता, प्रेम काही कमी झाले नाही.
गावातील कसलेही विधायक काम असो विजय अगदी आपल्या घरचेच काम समजुन पुढे होऊन करत असतो. विजय वैयक्तिक कोणाचे काम करत असताना तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, याचा कधी विचार करत नाही. लहानांना पण आदराने विचारपूस करणारा पै विजय मस्के माझा अगदी जवळचा मित्र आहेत.
*अशा या संकटसमयी उभा राहणाऱ्या दोस्ताचा आज वाढदिवस आहे. त्यांला माझ्या कडून शब्दरुपी शुभेच्छा*...
काही मित्र येतात आणि जातात,
मात्र जे मनात घर करून असतात,
ते शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात,
अश्या माझ्या जिवलग मित्राला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
"""""""""""""""""“"""""""""""
धन्यवाद
*पै मनोज मस्के*
पत्रकार दै पुण्यनगरी
Happiest Birthday Vijay
ReplyDelete