विक्रिकर निरिक्षक ते पोलिस उपायुक्त प्रवास* *कुस्तीची परंपरा वडीलोपर्जित जोपासनारे महान खेळाडू मा. पी.आर.पाटील साहेब (IPS)* *यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*.
*विक्रिकर निरिक्षक ते पोलिस उपायुक्त प्रवास* *कुस्तीची परंपरा वडीलोपर्जित जोपासनारे महान खेळाडू मा. पी.आर.पाटील साहेब (IPS)* *यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*.
.......................................................................
शाहुवाडी तालुक्यातील एक छोटेसे गाव सरूड याच गावातील त्या काळातील तुफानी पैलवान राजाराम पाटील (दादा) यांचे सुपुत्र पोलिस अधीक्षक मा. पी.आर. पाटील साहेब (IPS). घरचा तसा वारसा कुस्तीचा कारण वढलोपर्जीत चालत आलेली परंपरा आज सुद्धा या घराने कायम जपली आहे. साहेब गावच्याच जि.प. शाळेत शिकले. पुढील शिक्षण त्यांनी मलकापूर येथील विद्यालयात घेतले. पी.आर.पाटील साहेब उत्तम चित्र रेखटतात पंढरपुरचा विठूराया, विर बजरंगबली, शाहु,फुले,आंदळकर वस्ताद अशि शेकडो चित्र हुबेहुब त्यांनी रेखटली आहेत. त्याची रेखाटलेली चित्रे नुसती पाहतच बसावं असं वाटतं. प्रत्येक चित्रात भाव पाहायला मिळतात. साहेबांनी कोल्हापूरात रिक्षा चालवून आपले पुढील शिक्षण पूर्ण केले आहे. गरीबीचे चटके त्यांनी सहन केले आहेत.त्यामुळे ते प्रत्येक सामाजीक कामात पुढे असतात. गरजवंतांना नेहमी मदत करत असतात.
वडील शेतकरीच पण चांगले नामांकित पैलवान होते. कुस्ती आणी पंढरीची वारी नेहमीच कै. रामचंद्र पाटील दादांनी जपली. आपली दोन्ही मुलं त्यांनी पोलिस खात्यात देशसेवेसाठी लावली . पी.आर .पाटील साहेब (IPS) हे पोलीस अधीक्षक झाले तर अशोक पाटील हे हवालदार झाले.
पी.आर . पाटील साहेब (IPS) हे लहानपणापासूनच तालमीत जात असत. एकदा एक अॅम्बेसिटर कार त्यांच्या गावात बंद पडली. वरूण पाऊस पडत होता. पी.आर. पाटील साहेब शाळेतुन दुपारच्या सुट्टीत जेवायला घरी गेले होते. पाऊस पडत असल्याने त्यांना शाळेत परत जाण्यास उशिर झाला. शाळेत जात असताना त्यांना ही कार बंद पडलेली दिसली. या कारच्या ड्रायव्हिंग सिटवर एक महिला स्टेरींग सांभाळत होती व एक धीप्पाड शरीराचा रूबाबदार दिसणारा, धोतर व तिनबटनी सदरा घातलेला बजरंगासारखा दिसणारा व्यक्ती गाडीला धक्का देत आहे. तेवढ्यात साहेबांचे वडील रामचंद्र दादा आले आणी म्हणाले हे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर आबा आहेत. पी.आर. पाटील साहेबांनी पहिल्यांदा आंदळकर आबांना पाहीले होते. व कुस्तीतल्या संयमी शांत देवाचे त्यांनी दर्शन घेतले.
पाटील साहेबांनी कुस्ती बरोबर पोलिस खात्यात आपला दबदबा कायम ठेवला. अनेक चोरांना शोधुन काढून पोलीसी इंगा दाखवल्याने साहेब जातील त्या विभागात गुन्हेगार थरथर कापत होते. पंढरपूर येथे एका नामवंत बिल्डरच्या मुलाचे अपहरण झाले होते. त्यावेळी साहेबांनी वेशांतर करून काही तासांत अपहरणकर्त्यांच्या मुस्क्या आवळल्या होत्या. साहेबांचा प्रवास तसा विक्रीकर निरीक्षक, तहसिलदार, पोलीस उपअधीक्षक, पोलीस उपायुक्त ते पोलीस अधीक्षक या पदापर्यंत त्यांचा प्रवास तरूण पिढीला प्रेरणादायी आहे.
विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर १९९५ मध्ये त्यांनी स्पर्धापरिक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. दोनच वर्षांत त्यांनी विक्रीकर निरीक्षक परिक्षेत यश संपादन केले. त्यानंतर १९९८ मध्ये त्यांची तहसिलदार पदी निवड झाली. १९९९ मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून जळगाव येथे नेमणूक झाली. त्यानंतर पुणे गुन्हे अन्वेषण शाखेत पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.
*अशा या महान व्यक्तीचा आज वाढदिवस त्यांच्याबद्दल जे सुचलं ते लिहिलं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा*.
मनोजकुमार मस्के (पत्रकार)
९८९०२९१०६५ / ९५२९३०९६४०
Comments
Post a Comment