सहकारातील दिपस्तंभ विलासराव पाटील दादा
सहकारातील दिपस्तंभ विलासराव पाटील दादा मांगले गावचे सुपुत्र वारणा विविध उद्योग समुहातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्व मोरणा विविध उद्योग समूहाचे संस्थापक, विलासराव यशवंत पाटील दादा यांचा प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित विनम्र अभिवादन .... . मांगले गावात मोरणा विविध उद्योग समूहाच्या माध्यमातून सहकाराचे बीजारोपण करून मांगले गावच्या सर्वांगीण विकासात विलासराव पाटील दादा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे .सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे लोकनेते फत्तेसिंगराव नाईक स्वर्गीय नानासाहेब कोरे आधुनिक विज्ञानाचे शिल्पकार विलासराव कोरे माजी खासदार गुलाबराव पाटील वारणा कारखान्याचे व्हाचेअरमण बाजीराव बाळाजी पाटील यांच्यासोबत सहकार क्षेत्रात त्यांनी आदर्शवत भूमिका बजावली. वारणा सहकारी दूध संघाच्या स्थापनेपासून सतत पंचवीस वर्षे ते संचालक व दहा वर्षे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले .वारणा कारखान्याचे ते विद्यमान संचालक होते त्यासोबत वारणा डेअरीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले सांगली जिल्हा परिषदेचे सलग १३ वर्षे सदस्य होते...