‘दो अंगुठेवाले’ डॉ.पाराशर हिलिंग सेंटर आता मुंबईत

‘दो अंगुठेवाले’ 
डॉ.पाराशर 
हिलिंग सेंटर आता मुंबईत 

मधुकर भावे
१८ जानेवारी २0२१ ला जोधपूरला गेलो. त्या अगोदर जवळपास वर्षभर माझ्या उजव्या मणक्यातील कमरेजवळ शीर दबली होती. चालण अशक्य होतं, उभं राहणं शक्य नव्हतं. पत्नीच्या दोन वर्षांच्या आजारपणात हे दुखण फार लक्ष द्याव असं नव्हत म्हणून अंगावर काढलं, त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. मोठी नावे असलेल्या मणक्याच्या डॉक्टरांनी  ‘शस्त्रक्रीयेशिवाय पर्याय नाही’ असं सांगितलं होतं. पण वयामुळे (८२) शस्त्रक्रीया करु नका असंही सांगितलं. आता काय करावं? या अवस्थेत असताना जोधपूरच्या डॉ. गोवर्धनलाल पाराशर यांच्याकडे प्रथमच दोन मित्र मला घेवून गेले.श्री. अशोक मुन्शी आणि श्री. किशोर आग्रहारकर घेवून गेले. दहा मिनीटां्रच्या उपचारात एकदम टकाटक झालो. २५ जानेवारीपर्यंत तिथे राहीलो. पूर्ण ठणठणीत होवून परत आलो. झपाट्याने कामाला लागलो. ८ महिन्यात दोन पुस्तक झाली. १५ ठिकाणी भाषणं झाली. पण जोधपूरशी एक नातं जोडलं गेलं. ३१ जानेवारी २0२१ ला माझ्या आठवड्याच्या लेखामध्ये ‘दो अंगुठे की कमाल’ लिहीले. गेली ६0 वर्षे मी लिहीतो आहे. १0 हजार लेख छापून आले असतील. अग्रलेख वेगळे. पण या लेखाला जो काही प्रतिसाद मिळाला, त्याची गणती नाही. गेले ८ महिने रोज १५-२0 फोन येतात.  ३१ जानेवारीचा लेख वाचून जोधपूर येथील डॉ.पाराशर यांच्या रुग्णालयात महाराष्ट्रातले १७ ते १८ हजार रुग्ण पोहोचलेले आहेत. त्यातला ९५ टक्के लोकांना खूप फायदा झाला. कंबर, पाठ, मान, गुडघा, दुखणी थांबली. गोळ्या नाही, आॅपरेशन नाही. फक्त ‘अ‍ॅस्टिोपॅथी’ या पुरातन विद्येची कमाल आणि डॉ.पाराशर यांच्यासह त्यांच्या डॉक्टर टीमची मेहनत. जानेवारीनंतर ६ जुलैपर्यंत ८ वेळा जोधूपरला जावून आलो. दुखण््यावर उपचार करण्याकरीता अजिबात नाही. आता मला कसलाच त्रास नाही. पण मला जो फायदा झाला. तो असाच त्रास असलेल्या असंख्य लोकांना व्हावा ही भावना होती. त्यासाठी लेख लिहीला. हजारो लोक त्यामुळे जोधपूरला गेले. जाताना रडत, कण्हत, कुथत गेले, परत येताना मात्र चालत, हसत आणि आनंदी चेहºयाने परतले. यात कितीतरी नामवंत आहेत. त्यांची नावे पुन्हा देत नाही. पण जी सामान्य माणसं उपचार घेवून परत येत आहेत. त्यांच्या चेहºयावरचा आनंद जोधपूरला पाहणं पोटभर सुग्रास जेवणाएवढा आहे तो मी अनुभवतोय. 
पण मनात विचार होता की, सर्वांना जोधपूरला जाण जमणार नाही. प्रवास खर्चाचा आहे. विमान सामान्य माणसाला परवडणार नाही. कोरोना काळात रेल्वेने जाणं थोड धोक्याचंही आहे. म्हणून ३१ जानेवारीच्या लेखात अशी कल्पना मांडली होती की, महाराष्ट्रात आपण आरोग्य शिबीरे करुया. आपल्या ओळखीने शक्य होईल. म्हणून प्रथम डॉ.डी.वाय.पाटील यांना भेटलो. डी.वाय.दादांनी लगेच त्यांचे सुपुत्र विजय, अजिंक्यंना फोन लावले. नेरुळ डी.वाय.पाटील रुग्णालयात शिबिर घ्यायच ठरलं.  पिंपरी-चिंचवडला डॉ.पी.डी.पाटील यांनीही शिबिराची सर्व तयारी केली होती. ही गोष्ट गेल्या मार्च-एप्रिल मधली. तेव्हा कोरोना जोरात होता. आरोग्य खात्याने सांगितले की, ‘ शिबिर घ्यायला परवानगी देवू, पण येणाºया प्रत्येक रुग्णाची कोरोना टेस्ट  करावी लागेल. निगेटिव्ह असतील त्यांनाच परवानगी मिळेल. जोधपूरहून येणाºया डॉक्टरांची चाचणी दर तीन दिवसांनी करावी लागेल. शिबीरात एक सोडून एक खुर्ची ठेवावी लागेल... ’ या सर्व अटी ऐकल्यावर शिबीर घेण शक्य नाही असा निर्णय झाला.
आता काय करायच? दिवसाला रोज अनेक फोन यायचे.... शिबिर कधी होणार... सर्वांना एस.एम.एस उत्तर दिली. सध्या कोरोनामुळे शक्य नाही. पण मनाला स्वस्थता नव्हती. 
माझे मित्र श्री.मुन्शी आणि श्री किशोर यांनाही   चैन पडत नव्हतं. त्या दोघांनी हिंमत करुन मालाड येथे तीन गाळ्यांची जागा भाड्याने मिळवली. मला हे करण शक्य नव्हतं. मुंबईत जागा मिळविण्याचा प्रयत्न झाला. पण जे आकडे ऐकले नाहीत, एवढी किंमत होती. ते परवडणारं नव्हतं. शिवाय डॉ.पाराशर यांचा आग्रह होता की, सामान्य माणसाला परवडत असेल असं करा. माझ्या दोन्ही मित्रांनी सर्वस्व पणाला लावून भाड्याने जागा घेतली. सगळी तयारी झाली आणि सांगायला, लिहायला फार आनंद वाटतोय. मालाड येथे ही जी जागा मिळाली आहे ती भाडे तत्वावर आहे. १४ आॅगस्ट २0२१ पासून या जागेत ‘डॉ.गोवर्धनलाल पाराशर हिलिंग सेंटर’ सुरु होत आहे. जोधपूरचे चार निष्णात डॉक्टर या सेंटरला काम करतील.  काही दिवस डॉ. पारशर साहेब स्वत: येतील. डॉ.गिरीराज पाराशर हेही निष्णात आहेत. ते पूर्ण महिनाभार राहतील. मग दुसरे दोन डॉक्टर येतील. जोधपूरचे मुख्य केंद्र व्यवस्थित चालू ठेवूनच मुंबईतील उपनगरात हा नवीन प्रयोग सुरु करायचा आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. या रुग्णालयाच्या प्रशासकीय व्यवस्था श्री.अशोक आणि श्री.किशोर पाहतील. सगळी वैद्यकीय व्यवस्था आणि उपचार डॉ. पाराशर टीम जीव ओतून काम करतील. 
या उपचार केंद्राला पहिली सदिच्छा भेट देशाचे माजी केंद्र्रीय गृहमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे आणि प्रख्यात लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष, माजी खासदार श्री विजयबाबू दर्डा दिनांक १७ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता भेट देणार आहेत. 
सर्व ज्येष्ठ-श्रेष्ठ आणि सामान्य रुग्ण यां च्याच पाठिंब्यावर मुंबईचा हा प्रयोग यशस्वी होईल. सामान्य माणसांच दु:ख आणि त्रास दूर होताना सर्वांना पाहता येईल  त्याचेच सगळ्यात मोठे समाधान आहे. 

पाराशर हिलिंग सेंटर
गाळा नं.२१४७,
 तळमजला, ईझी झोन मॉल, रुस्तमजी टॉवरजवळ
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड,
मालाड (प) मुंबई ४00 0६४
टङ्मु. ठङ्म.: 9768965333/9833770304/05
छंल्ल ि’्रल्ली ल्लङ्म.: 
02240123125

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*