सहकारातील दिपस्तंभ विलासराव पाटील दादा
सहकारातील दिपस्तंभ
विलासराव पाटील दादा
मांगले गावचे सुपुत्र वारणा विविध उद्योग समुहातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्व मोरणा विविध उद्योग समूहाचे संस्थापक, विलासराव यशवंत पाटील दादा यांचा प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित विनम्र अभिवादन .... .
मांगले गावात मोरणा विविध उद्योग समूहाच्या माध्यमातून सहकाराचे बीजारोपण करून मांगले गावच्या सर्वांगीण विकासात विलासराव पाटील दादा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे .सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे लोकनेते फत्तेसिंगराव नाईक स्वर्गीय नानासाहेब कोरे आधुनिक विज्ञानाचे शिल्पकार विलासराव कोरे माजी खासदार गुलाबराव पाटील वारणा कारखान्याचे व्हाचेअरमण बाजीराव बाळाजी पाटील यांच्यासोबत सहकार क्षेत्रात त्यांनी आदर्शवत भूमिका बजावली. वारणा सहकारी दूध संघाच्या स्थापनेपासून सतत पंचवीस वर्षे ते संचालक व दहा वर्षे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले .वारणा कारखान्याचे ते विद्यमान संचालक होते त्यासोबत वारणा डेअरीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले सांगली जिल्हा परिषदेचे सलग १३ वर्षे सदस्य होते. विश्वासराव नाईक साखर कारखाना संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले .सांगली जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे दहा वर्षे संचालक होते .सांगली जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक पदी त्यांनी काम पाहिले त्याचबरोबर त्यांनी मांगले गावांमध्ये मोरणा सहकारी दूध उत्पादक संस्था, मोरणा विकास सेवा सोसायटी धनटेक वारणा पाणीपुरवठा संस्था गृहलक्ष्मी ग्रामीण सहकारी पतसंस्था, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ ,विलासराव पाटील औद्योगिक प्रशिक्षण क्रेंद इंदिरा महिला औद्योगिक संस्था या संस्थांची त्यांनी स्थापना केल्या व त्या चांगल्याप्रकारे चालवल्या त्यामुळे गावातील सामान्य माणसाला हातभार लागला सामान्य माणसाच्या अर्थ व्यवस्थेला चालणा मिळाली मांगले गावात सत्तेसाठी हेवेदावे गटातटाचे राजकारण न करता सहकारी संस्था उभा करुन अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला दुध उत्पादकांच्या कष्टाला न्याय दिला दुधाला योग्य भाव दिला त्यामुळेच कुटुंब व्यवस्था दुध व्यवसायाकडे वळली व यावरच आजही उदर निर्वाहाचा मुख्य व्यवसायहा दुध आहे
मांगले गावच्या
विकासासाठी दादांनी अविरतपणे प्रयत्न केले याची दखल घेऊन मांगले ग्रामपंचायतीने त्यांना मांगले भूषण म्हणून मानपत्र देऊन गौरविले होते सांगली जिल्हा परीषदेत 13 वर्षे दिवंगत नेते आर आर पाटील आमदार अनिल बाबर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक अजितराव घोरपडे प्रा राम उगळे यांच्या सोबत काम केले होते खासदार श्रीनिवास पाटील राज्याचे नेते जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील दिलीपराव सोपल यांच्या सह अनेक नेतेमंडळीबरोबर मैत्रीचे जिव्हाळ्याचे संबध होते आमदार विनय कोरे सावकर आमदार मानसिंगराव नाईक यांच्या विचारांशी नेहमीच एकनिष्ठ राहिले वारणा विविध उद्योग समुहात मांगले सह परीसरातील शेकडो युवकांच्या हाताला काम दिले पण अपवादाने देखील कोणाकडून कसलीही अपेक्षा स्वार्थ साधला नाही जनसेवेसाठी आयुष्य घालवलेले दादा अखेरपर्यंत साधे जिवण जगले यश आकाशाला गवसणी घालणारे असले तरी पाय जमिनीवर ठेवुन विकासाचे दालन मांगले गावातच मोरणा विविध उद्योग समुहाच्या माध्यमातून उभे केले दादांच्या निधनाने मांगले व वारणा परीसरातील सहकार क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे दादांचे स्वप्न जनसेवेचा समाजकार्याचा सहकार क्षेत्रातील अतुलनीय कामाचा वसा नवीनकुमार पाटील सत्यजित पाटील दादांच्या जुन्या नव्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन अखंडपणे विश्वासार्हता पुर्ण चालवत आहेत हिच विलासराव पाटील दादांना भावपुर्ण श्रध्दांजली 🙏🙏
विजय गराडे पत्रकार
पुण्यनगरी मांगले
संचालक मोरणा विकास सेवा सोसायटी मांगले
सल्लागार कुष्णराव पाटील सहकारी पतसंस्था शाखा मांगले
Comments
Post a Comment