१५ ॲागस्ट ला डी.आर जाधव उर्फ अण्णांना पोलिस दलातील उत्क्रुष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक देवून सन्मानित करण्यात आले.
१५ ॲागस्ट ला डी.आर जाधव उर्फ अण्णांना पोलिस दलातील उत्क्रुष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक देवून सन्मानित करण्यात आले.त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
आपल्या ग्रामीण महाराष्ट्रातुन खुप सारे तरुण नोकरी कामधंद्याच्या निमित्ताने मुंबईला जातात.त्यापैकीच एक डी.आर अण्णा,एस.एस.सी नंतर कामधंद्याच्या निमित्ताने मुंबई नगरीमध्ये गेले.महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादांची थाप त्यांच्या पाठीवर पडली आणि त्यांना पोलिस सेवेमध्ये भरती होण्याची संधी मिळाली.
घरची अत्यंत गरिबीची परिस्थिती.दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणारया कुटुंबातुन हा तरुण पोलिस सेवेत रुजु झाला.ते घरची आर्थिक गरिबी असली तरी आई वडीलांच्या संस्काराची श्रीमंती घेवून मुंबानगरीत दाखल झाले. सर्वांना पुढे घेऊन जाण्याच्या व्रुत्ती,वरिष्ठांबद्दल आदराची भावना त्यामुळे भरतीनंतर काही वर्षातच त्यांनी अधिकारयांच्या मर्जी संपादन केली.
लहान मुलापासून अबाल व्रुध्दापर्यंत सर्वांशी अत्यंत आपुलकीच्या भावनेने वागवणारे अण्णा त्यांच्या वैयक्तिक जीवनात अजात शत्रू आहेत.
पोलिस खात्यातील नोकरी बरोबर इतर काही व्यवसायामध्ये त्यांनी चांगल्यापैकी आपला जम बसवला.आर्थिक सुबत्ता आली म्हणून त्यांनी त्याचा कधी माज येवू दिला नाही.सतत पाय जमिनीवर ठेवून वास्तवाचे भान ठेवले आहे.
माझ्या सारख्या चळवळीमध्ये काम करणारया कार्यकर्त्याला डी.आर अण्णांचा अभिमान वाटतो.तो यासाठी की त्यांनी जपलेली सामाजिक बांधीलकी.आपण ज्या मातीत वाढलो,ज्या समाजात जन्मलो त्याच काहीतरी देण लागतो याची सतत जाणीव ठेवणारे डी.आर अण्णा सर्वांना हवे हवेसे वाटतात.
आमचा वारणा पट्टा विशेषत: मातीतील कुस्तीसाठी प्रसिध्द आहे.एक काळ असा होता की वारणा खोरयातील काही गावांच्या मध्ये तर घरटी एकतरी पोरग पैलवान असायला पाहिजे अशी धारणा होती.सुदैवाने ते ज्या गावामध्ये जन्मले त्या चिंचोली ता.शिराळा या गावाने कुस्तीची परंपरा आजही जोपासली आहे.सहाजिकच लहाणपणापासून त्यांना कुस्तीची आवड परंतु घरच्या आर्थिक अडचणीमुळे जोपासता नाही आली.पण आज जो तरुण कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी करत असेल आणि घरची बेताची परिस्थिती असेल तर त्या तरुणांच्या पाठीमागे भक्कम आर्थिक पाठबळ देवून त्याला कुस्तीक्षेत्रामध्ये नामांकित मल्ल करण्यासाठी मदत करणारे अण्णा हे विरळ उदाहरण असलेले आपणास बघावयास मिळते.
या लाल मातीतील कुस्तीवर किती प्रेम असाव याच ज्वलंत उदाहरण अण्णांच्या रुपाने आपणा सर्वांसमोर आहे.
ग्रामीण महाराष्ट्रातील कोणत्याही खेड्यात कुस्तीचे मैदान कोठेही असूदे डी.आर अण्णांची हजेरी त्या मैदानाला निश्चितपणे असते.केवळ मुंबईसह ग्रामीण महाराष्ट्रातच नाही तर उत्तर कर्नाटकातील कित्येक मैदानाला हजेरी लावतात.मैदानात फक्त हजेरी लावत नाहीत तर त्या मैदानात उत्कृष्ट कामगिरी करणारया पैलवानांच्यावर लाखो रुपयांची खैरात करणारे डी.आर अण्णा हे माझ्या बघण्यातील एकमेव व्यक्तिमत्व आहेत.
या त्यांच्या सामाजिक बांधिलकी जपण्याबरोबरच कौटुंबिक वात्सल्यही जपलेले बघावयास मिळत आहे.सतत आई-वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवणारे डी.आर अण्णा मातृभक्त आहेत.मातृभक्ती हा त्यांच्यातला भावलेला गुण आहे.पण त्यांची आई म्हणजे त्यांचा जीव की प्राण आहे.आजही एवढ्या मोठ्या कुटुंबात त्यांच्या आईचा शब्द प्रमाण मानला जातो.सोनवडे येथे उभ्या केलेल्या शेती प्रकल्पास त्यांनी मातोश्री हे नाव दिले आहे.आई वडीलांच्या प्रत कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच त्यांचे वडील बंधू केशव जाधव(दाजी) यांचेबद्दलही बोलताना सदैव कृतज्ञता जाणवते.कारण याच बंधुंनी अण्णांना मुंबानगरीत नेले व नोकरी मिळेपर्यंत स्थिरस्थावर केले.
डी.आर अण्णा हे आजच्या धक्काबुक्कीच्या आणि धावपळीच्या युगात तरुणांच्या समोर आदर्श आहेत.नोकरी किंवा उद्योग धंद्यातुन स्थिर स्थावर झालेली माणसे आपले घर किंवा बायका-मुलांतून बाहेर पडत नाहीत.ज्या गाव-समाजातुन आपण आलोय त्यांच काहीतरी आपण देण लागतो हे मानायला तयार नाहीत.अशा परीस्थितीत डी.आर अण्णा हे एक आपल्या कुटुंबासह सामाजिक कृतज्ञता जपणारा,पोलिस खात्यातील खाकी वर्दी परिधान करुनही एक अत्यंत संवेदनशील,माणुसपण जपणारा माझा अत्यंत जिवाभावाचा मित्र,भाऊ म्हणुन मी त्यांच्या पुढील भावी जिवनाच्या वाटचालीस खुप शुभेच्छा देतो.आणि उत्तरोत्तर अशीच सामाजिक काम करण्याची ताकद त्यांना मिळो याच सदिच्छा.💐
-बाळासाहेब नायकवडी
उपसभापती,पंचायत समिती शिराळा.
Comments
Post a Comment