चार वर्षांच्या सागर चव्हाण या मुलालानिताताई खोत यांनी दिला मायेचा हक्काचा आधार
चार वर्षांच्या सागर चव्हाण या मुलाला निताताई खोत यांनी दिला मायेचा हक्काचा आधार गेली चार वर्षापासुन ओम साई राम सेवाभावी ट्रस्ट च नवी मुंबई च्या माध्यमातून सौ निताताई खोत सानपाडा येथील झोपडपट्टी मधील विविध प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर काम करत आहेत गोरगरिबांना विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत सध्या कोरोनाचा गंभीर कसोटीचा काळ सुरु आहे अनेकजण बेरोजगार झाले आहेत झोपडपट्टी मध्ये राहणारी कुटुंबे लॉकडाऊन काळात हाताला काही काम धंदा नसल्याने आर्थिक अडचणीत आहेत सौ निताताई खोत झोपडपट्टीत गेल्या असता यांच्या निदर्शनास आले कि चार वर्षाचा मुलगा ज्याची आई ३ वर्षांपूर्वी देवाघरी गेली होती . त्यांच्या वडिलांच्या देखील हाताला कामधंदा नव्हता. आणि ते पूर्ण व्यसनाच्या आहारी गेलेले होते ट्रस्ट च्या माध्यमातून कोरोना काळात त्यांना धान्य, कपडे, या स्वरूपात मदत करत होत्या पण बुधवारी अचानक सौ निताताई खोत त्यां गरीब व गरजुंना...