कडक शिस्तीचे पी टी शिक्षक भगवान बडेकर यांचे वृद्धापकाळाने निधन*...
*कडक शिस्तीचे पी टी शिक्षक भगवान बडेकर यांचे वृद्धापकाळाने निधन*...
..............................
शिराळा तालुक्यातील चरण गावातील मारुती विद्यालय चे शिस्त प्रिय शिक्षक *आदरणीय भगवान बडेकर यांची शुक्रवार दि. १६/ ०४/ २०२१ रोजी त्यांच्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली*.
सरांचे मुळ गाव पाटण तालुक्यातील गुढे हे असुन त्यांचा जन्म १५.६ .१९३८ साली झाला.
त्यांचे पुर्ण नाव भगवान संतराम बडेकर असे आहे.
सरांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पहिल्यांदा शिक्षक म्हणून मुंबई मध्ये हिंद विद्यालय आणि अंजुमन विद्यालय येथे काही वर्षे कार्यकाळ सांभाळला, त्यानंतर आपल्या गावाकडे म्हसवड येथे सिद्धनाथ हायस्कूल वर काही वर्षे नोकरी केली, आणि १९७५ पासून श्री मारुती विद्यालय चरण येथे ते रुजु झाले.
मारुती विद्यालय हे एक त्यावेळी भाड्याच्या इमारतीत होते आणि त्या इमारती ला लागुन एका छोट्या घरात सर आपल्या परिवारासह राहायचे.
बडेकर सर म्हणजे मारुती विद्यालयात एक मोठी हस्ती होती. शाळा म्हणजे काय, आणि त्या शाळेचे नियम म्हणजे काय, शिस्त म्हणजे काय, हे सरांनी मारुती विद्यालयाला दिलेली एक देणगी आहे. सरांच्या पी टी च्या तासाला
सर्व मुलं मुली रांगेत व्यवस्थित उभे राहून पी टी चे प्रशिक्षण घ्यायचे,सकाळी प्रार्थना सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली असायची पण एवढ्या मुलात जो कोणी विद्यार्थी आदल्या दिवशी नसायचा त्यांना बरोबर माहीत असायचे, लगेच त्या मुलाला तु काल कुठे गेला होतास? योग्य कारण असेल तरच त्याची खैर... नाहीतर त्यांची शिक्षा असायची.. पण सरांच्या शिक्षेने मुलांना बरेच काही शिकवले, वेळेवर शाळेत पोहचणे, रोज शाळेत हजर राहणे, याच्या मुळे मुलांमुलींना एक चांगली सवय लागली. १९९३ ते ९८ आम्ही त्या शाळेत आठवी ते बारावी पर्यंत चे शिक्षण घेतले.
*१९९६ ला सर मारुती विद्यालयात असताना रिटायरमेंट झाले* सर काही दिवस चरण या गावातच होते त्यानंतर ते आपल्या गावी वास्तव्यास गेले. कराड शहरात त्यांचा टुमदार असा बंगला आहे आणि रिटायरमेंटनंतरचे त्यांचे आयुष्य तेथेच गेले.
*२०१६ साली आमच्या दहावीच्या बॅचच्या स्नेह मेळाव्यास सुद्धा ते उपस्थित होते* एवढ्या वर्षांनी सुद्धा त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची अगदी आपुलकीने विचारपुस केली
त्यांना एक मुलगा आणि पाच मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. *त्यांचे एकुलते एक चिरंजीव दिपक बडेकर हे मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशन मध्ये कार्यरत आहेत*, तर त्यांचे सर्व जावई मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत. आणि नातु सुद्धा इंजिनिअर, डॉक्टर , प्राध्यापक आहेत
बडेकर सरांचे रक्षाविसर्जन आणि उत्तरकार्य रविवार दि १८ /०४/ २०२१ रोजी कराड येथे त्यांच्या राहत्या घरी आहे.
*त्यांच्या दुख:त मारुती उच्च माध्यमिक विद्यालय, शिक्षक स्टाप,सर्व आजी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि कर्मचारी वृंद...... सहभागी आहे*.
•••••••••••••••••••••••••
धन्यवाद
✍️ *लेखन- पै अशोक सावंत -पाटील* - -सोंडोलीकर
कुस्ती संघटक
मो 9702984006
भावपूर्ण आदरांजली !
ReplyDelete