चार वर्षांच्या सागर चव्हाण या मुलालानिताताई खोत यांनी दिला मायेचा हक्काचा आधार

चार वर्षांच्या सागर चव्हाण या मुलाला
निताताई खोत यांनी दिला मायेचा  हक्काचा आधार                
गेली चार वर्षापासुन  ओम साई राम सेवाभावी ट्रस्ट च नवी मुंबई  च्या माध्यमातून  सौ निताताई खोत  सानपाडा येथील झोपडपट्टी  मधील विविध प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर  काम करत आहेत गोरगरिबांना विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत 
सध्या कोरोनाचा गंभीर कसोटीचा काळ सुरु आहे अनेकजण  बेरोजगार  झाले आहेत झोपडपट्टी मध्ये राहणारी कुटुंबे लॉकडाऊन काळात  हाताला काही काम धंदा नसल्याने आर्थिक अडचणीत आहेत  सौ निताताई खोत झोपडपट्टीत  गेल्या असता यांच्या  निदर्शनास आले कि चार वर्षाचा मुलगा ज्याची आई ३ वर्षांपूर्वी देवाघरी गेली होती  . त्यांच्या वडिलांच्या देखील हाताला कामधंदा नव्हता. आणि ते पूर्ण व्यसनाच्या आहारी गेलेले होते  ट्रस्ट च्या माध्यमातून कोरोना काळात त्यांना धान्य, कपडे, या स्वरूपात मदत करत होत्या पण बुधवारी अचानक सौ निताताई खोत   त्यां गरीब व गरजुंना  खाऊ ,जेवण व धान्य घेऊन वाटप  करायला गेल्या  असता चार वर्षाच्या सागर ला  आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो आपल्या वडिलांच्या कुशीत गाढ झोपला होता पण त्या बाळाला आपल्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला आहे हे समजले नाही पण  सौ निताताई खोत व त्यांच्या सोबत असणाऱ्या सेवाभावी ट्ष्ट च्या सर्वाच्या लक्षात येताच . हा मुलगा  आज अनाथ झाला हे बघून सर्वजणांचे हृदय भरून आले. पण आलेल्या संकटावर मात योग्य पध्दतीने करत निताताईनी तेथील स्थानिक  पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. तेथील पोलीस मदतीसाठी धावून आले. नंतर नवी मुंबई महानगर पालिकेशी संपर्क साधून त्या मुलाच्या वडिलांचा रीतसर पंचनामा करून पालिकेच्या ताब्यात दिले. हे सर्व करताना रात्री चे १२ वाजले. त्यांच्या वडिलांचे निधन कोरोनाने झाले की आणि कशाने हे जाणून घेण्यासाठी  त्यांच्या बॉडीची व सागरची  कोरोना टेस्ट केली. ती निगेटिव्ह आली.
आता याछोट्या  मुलाचं काय करायचे असा प्रश्न निताताई च्या  समोर होता. हा चार वर्षाचा सागर  अनाथ झाला होता  खूप संपर्क करून सुद्धा  त्यांच्या  कोणत्याही नातेवाईकाशी संपर्क झाला नाही किंबहुना कोणीही पुढे आले नाही  अशा बिकट समयी सौ निताताईनी सागरसाठी प्रयत्नशील राहुन  जीवन ज्योती आशालय या आश्रमाशी संपर्क साधून त्या मुलाच्या संगोपनासाठी, शिक्षणासाठी त्याला तिथे ठेवण्यात यावे अशी विनंती केली .व त्यांनीही सागरला  अनाथ आश्रमात रहाण्याची व संगोपनाची शिक्षणाची करीयरची जबाबदारी घेतली  ओम साई राम सेवा भावी ट्रस्ट च्या माध्यमातून सदस्यांनी व  सौ निताताई खोत  या सागर साठी देवदुतच ठरल्या  
कोरोनाने मुबंईत थैमान घातले आहे पण अशा आणीबाणीच्या काळात सौ निताताई खोत सिमेवर जवाण देशासाठी लढतात त्याप्रमाणेच या चार  वर्षांच्या  सागर चव्हाण साठी प्रयत्नशील राहुन त्याला मायेच हक्काचे  घर मिळवुन दिले      विजय गराडे पत्रकार पुण्यनगरी   मांगले  8805223000

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*