*मा भिमराव पाटील यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी निवड*......
*मा भिमराव पाटील यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी निवड*...... ......................... विशेष लेख ✍️ *पै अशोक सावंत पाटील*- सोंडोलीकर ............................. शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली गावचे सुपुत्र *मा. भिमराव पाटील* यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी नुकतीच निवड झाली आहे. या योजनेअंतर्गत अनेक निराधार, विधवा महिलांना, तसेच ६५ वर्षावरील स्त्री/पुरुषांना पेन्शन स्वरूपात लाभ मिळवून देणे, त्यांच्या न्याय हक्कासाठी शासनाकडे पाठपुरावा करून त्याचा लाभ त्या निराधार, महिलांना, त्यांच्या हक्काचे आर्थिक सहाय्य मिळवून देणे, हे या समितीचे ध्येय असते. त्याचबरोबर शोषित, पिडीत, वंचित, दीन दलित दुबळे, शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी या स्तरातील लाभार्थींना सुद्धा लाभ होईल आणि तो मिळाला पाहिजे, त्याच वेळी खर्या अर्थाने या खुर्चीचे आदराचे स्थान निर्माण होणार आहे, सोंडोली गावच्या एका दानतदार व्यक्ति ला ही अध्यक्ष पदाची धुरा सांभाळायला मिळालेबद्ल भिमराव पाटील यांचे विविध स्त...