*मा अजित पाटील वाढदिवस विशेष लेख*.....
*मा अजित पाटील वाढदिवस विशेष लेख*.....
...........................
✍️ पै अशोक सावंत/पाटील सोंडोली
...................
शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली गावचे सुपुत्र *मा अजित पाटील यांचा आज जन्मदिवस*.
अजित पाटील यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर मी इतकेच म्हणेल की अजित हा असा मुलगा आहे जे आपल्याला करायचे, ते करायचेच, त्याच्या मुळात जाऊन ते ध्येय गाठण्याचा प्रयत्न करायचाच असे असणारे अजित पाटील.....
लहानपणापासून शिक्षणाबरोबर पैलवान व्हायची आवड, आणि त्याचबरोबर त्यांची एकच इच्छा होती ती म्हणजे आर्मीत भरती व्हायची, आणि देशची सेवा करायची पण म्हणतात ना की सर्व काही व्यवस्थित चालू असताना काहीतरी अनर्थ घडतोच, या उक्तीप्रमाणे अजित पाटील यांचा एक छोटासा अपघात झाला आणि या सर्वांवर पाणी फिरले, अजित पाटील यांनी आर्मीत भरती व्हायला भरपूर मेहनत घेतली होती, तन मन धन हरपुन प्रॅक्टिस केले होते. कोणत्याही क्षेत्राची आपल्याला आवड निर्माण झाली की त्या क्षेत्रात आपण झोकुन देतोच, आणि झोकुन दिल्या शिवाय त्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण होत नाही, अजित खचुन जाता आपल्याला आर्मीत जाता आले नाही पण इतर मुलांना आर्मीत कसं जाता येईल याच्या बद्दल ते नेहमी प्रयत्न करत असतात. येणाऱ्या काळात मुलांना जास्तीत जास्त कसं आर्मीत जाता येईल याच्या बद्दल नेहमी त्यांचा प्रयत्न असतो. मुलांना आर्मीत जाण्यासाठी धडे देण्यासाठीचे केंद्र म्हणजे अकॅडमी...आणि येणाऱ्या काळात हीच अकॅडमी चालु करण्याचा त्यांचा माणस आहे. मुंबईत खाजगी क्षेत्रात जॉब करणारे अजित पाटील हे खेळावर सुद्धा भरपुर प्रेम करत असतात. त्यांचा मित्र समुह मोठा आहे त्याच्या माध्यमातून शाहुवाडी तालुक्यातील इतर मुलांच्या सहकार्याने *शाहुवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन ची स्थापना त्यांनी अलिकडेच नुकतीच मुंबई मद्ये केली आहे* ,याच्यातुनच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून मुलांना खेळण्यासाठी ची संधी त्याठिकाणी मिळत आहे. क्रिकेट मध्ये करिअर करणार्या अनेक मुलांना त्याचा फायदा होत आहे.. स्पर्धेमध्ये खेळल्या वर मुलांचा आत्मविश्वास देखील वाढत आहे.
याच्या पलिकडे जाऊन अजित पाटील असं एक वेगळे व्यक्ती मत्व आहे की ते कोणाशीही नम्रपणे बोलत असतात, कुणाशीही आत्मियतेने वागतात, म्हणूनच त्यांचा मित्र समुह मोठा आहे. जीवनात येऊन त्यांनी बरेच काही कमवले आहे त्याच्या मध्ये वेगळे काही कमवले असेल तर ती म्हणजे माणुसकी आणि माणसे..... हाच तर अजित पाटील यांच्या जीवनातला महत्त्वाचा घटक आहे... सोंडोली गावच्या कुस्ती मैदान साठी अजित यांचा मोठा हातभार असतो. गावातील तालमीच्या नूतनीकरणासाठी सुद्धा त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे.. गावातील कोणत्याही धार्मिक, राजकीय, सामाजिक,कार्यक्रमासाठी के उपस्थित असतात..
अशा या अवलिया चा आज वाढदिवस आहे त्यांना *कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य तर्फे वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा*
•••••••••••••••••••••••••••
धन्यवाद
*पै अशोक सावंत/पाटील* कुस्ती संघटक
*कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य*
अध्यक्ष शाहुवाडी तालुका
मो 9702984006
Comments
Post a Comment