*मा भिमराव पाटील यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी निवड*......


*मा भिमराव पाटील यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी निवड*...... 
......................... 
विशेष लेख 
✍️ *पै अशोक सावंत पाटील*- सोंडोलीकर
............................. 
शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली गावचे सुपुत्र  *मा. भिमराव पाटील* यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी नुकतीच निवड झाली आहे. 

  या योजनेअंतर्गत अनेक निराधार, विधवा महिलांना, तसेच ६५ वर्षावरील स्त्री/पुरुषांना  पेन्शन स्वरूपात लाभ मिळवून देणे, त्यांच्या न्याय हक्कासाठी शासनाकडे पाठपुरावा करून त्याचा लाभ त्या निराधार, महिलांना, त्यांच्या हक्काचे आर्थिक सहाय्य मिळवून देणे, हे या समितीचे ध्येय असते. त्याचबरोबर शोषित, पिडीत, वंचित, दीन दलित दुबळे, शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी या स्तरातील लाभार्थींना सुद्धा लाभ होईल आणि तो मिळाला पाहिजे, त्याच वेळी खर्या अर्थाने या खुर्चीचे आदराचे स्थान निर्माण होणार आहे, सोंडोली गावच्या एका दानतदार व्यक्ति ला ही अध्यक्ष पदाची धुरा सांभाळायला मिळालेबद्ल भिमराव पाटील यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. भिमराव पाटील हे मा. आमदार सत्यजित आबांच्या गटाचे समर्थक असुन त्यांनीच *जिल्ह्याचे पालकमंत्री मा सतेज उर्फ़ बंटी पाटील साहेबांच्या कडे भिमराव पाटील यांच्या नावाची शिफारस केली होती*, म्हणूनच ही निवड जिल्हा अधिकारी कार्यालयातुन झाली आहे. या समितीचे दहा सदस्य असतात, बीडीओ सुद्धा या समितीचे सदस्य असतात. तहसिलदार यांच्या नियंत्रणाखाली या समितीचे कामकाज चालत असते. 

सोंडोली हे गाव तसे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे
  पहिली ते दहावी पर्यंत आम्ही एकञच शिक्षण घेतले भिमराव पाटील यांच्या बरोबर शिक्षण घेत असताना आम्हाला बरेच अनुभव आले त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक  शिक्षण पूर्ण झाले त्यांच्या बरोबर आम्हीही होतोच .... 
उच्च शिक्षणाबरोबर राजकारणाची आवड त्यांना निर्माण व्हायला लागली. त्याच्यातच त्यांचे उच्च शिक्षणही पुर्ण झाले. 
राजकारणातला थोडा थोडका अनुभव, असणारे भिमराव पाटील यांनी  राजकीय अभ्यास करायला  सुरवात केली, आणि इथेच त्यांना राजकारणातली खरी दिशा मिळायला पण सुरुवात झाली. 

 भिमराव पाटील हे कोणतेही विधायक काम असो, सामाजिक, शैक्षणिक कामात हे तत्पर असायचे अर्ध्या राञी कुणीही फोन केला तरी ते त्यांच्या मदतीला धावुन जात असायचे गावातील कुणाचेही कसलेही काम असो ते हसतमुखाने करत असायचे आपल्या खिशातील पैसे खर्च होतील त्याचा ते विचारही कधी करायचे नाहीत गोरगरिबांच्या तर सतत मदतीला धावून येत असत अशा या वागण्याने अल्पावधीतच लोकप्रिय झाले *आणि गावाने त्यांना २०१० साली उपसरपंच म्हणून निवडून दिले आणि इथेच खर्या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरवात झाली आणि त्यानंतर लगेच २०१५ साली त्यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांना सरपंच म्हणून निवडून दिले*. आणि  गावाची सेवा करण्याची बळकटी त्यांना मिळाली. *एवढेच काय तर चालु वर्षी तर गावाने पुन्हा एकदा त्यांच्या पत्नीला बिनविरोध सरपंच म्हणून विराजमान केले आहे*. 
कोणत्याही माणसाच्या कर्तृत्वाने तो मोठा होत असतो याचा प्रत्यय याठिकाणी दिसुन येत आहे. 
कोरोणा सारख्या महामारीत गावासाठी अनेक उपाय योजना त्यांनी राबविल्या आहेत

राजकारण आणि समाजकारण हे सर्व गावासाठी करत असताना त्यांना बरेच चढउतार आले पण ते डगमगले नाहीत 

सोंडोली गावचे हे सुपुत्र  तालुक्याच्या राजकारणातील किंगमेकर व अल्पावधीतच  आपल्या कार्य कर्तृत्वाने फार मोठे नाव करणारे, सामान्य माणसातील असामान्य व्यक्ति मत्व, कधी कुस्ती न खेळलेले पण कुस्ती सारख्या रांगड्या खेळावर वर्षाला लाखो रुपये खर्च करणारे एक दानतदार व्यक्ति
*आणि अशा या व्यक्तिला २०१७ साली पक्षाकडून शित्तुर वारुण मतदार संघातून पंचायत समितीचे तिकीट मिळाले.* पण या निवडणुकीत त्यांना अगदी थोडक्या मताने म्हणजे  हाताच्या बोटावर मोजण्या इतपत मताने विजयाने हुलकावणी दिली.राजकारणात विजय-पराजय हा असतोच      आणि पराभवाने खचून न जाता तेवढ्याच जिद्दीने ते पुन्हा कामालाही लागले 

आयुष्यात  गावाची सेवा करण्यात आपले जीवन व्यतीत करणारे कोणावरही अन्याय न करता न्यायदानाचं, त्यांचं काम मी अनेक वर्षांपासून माझ्या डोळ्यादेखत पाहत आलो आहे. 
अशा या निस्वार्थी व्यक्तिमत्वाला  संजय गांधी निराधार योजना समितीने तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करून एक उल्लेखनिय काम केले आहे,

 आमचे वर्गमित्र मित्र *मा.भिमराव पाटील* यांना *कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य* संघटनेकडून त्यांना *पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा*.. 
•••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद
*पै अशोक सावंत/पाटील* कुस्ती संघटक-
*कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य* 
अध्यक्ष शाहुवाडी तालुका
मो. 9702984006

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*