*चालु वर्षी महाशिवरात्रीनिमित्त होणार्या चिंचोली गावच्या यात्रेची परंपरा कोरोणा संसर्गामुळे खंडीत*.

*चालु वर्षी महाशिवरात्रीनिमित्त होणार्या चिंचोली गावच्या यात्रेची परंपरा कोरोणा संसर्गामुळे खंडीत*. 
.............................
.............. 
या वर्षी चिंचोली गावची आत्मलिंग देवाची यात्रा कोरणा प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. गावातील काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विधिवत पुजा करण्यात येणार आहे. 

दरवर्षी महाशिवरात्रीला या गावच्या यात्रेला प्रारंभ होतो दुसर्या दिवशी आत्मलिंग देवाच्या परिसरात मेवा मिठाई,खेळण्याचे स्टॉल उभे असताना आपल्याला दिसायचे. आणि तिसऱ्या दिवशी कुस्तीचे मोठे मैदान याठिकाणी संपन्न होत होते. पन चालू वर्षी हे मैदान कोरोणा मुळे होणार नाही असे ग्रामस्थांनी सांगितले आहे
       चिंचोली गावची यात्रा म्हणजे पंचक्रोशीतील लोकांना पर्वणीच असते, खासकरुन या यात्रेत महाराष्ट्रातील तसेच भारतातील टॉपचे पैलवान आणुन लढवण्याची किमया ग्रामस्थांनी केली आहे. 

 दुपारी ३ वाजले नंतर हालगीच्या निनादामद्ये वाजत गाजत कुस्ती मैदानाला प्रारंभ व्हायचा आत्मलिंग देवाच्या मंदिराजवळ असणाऱा प्रशस्त असा कुस्ती आखाडा कुस्ती शौकिंनांनी नुस्ता भरुन जायचा, पण चालू वर्षी या सर्वांवर विरझण पडणार आहे. 
अनेक दशके चालत आलेली परंपरा यावर्षी खंडीत होत आहे.  पण शासनाच्या नियमाचे पालन करुन हेच योग्य समजून गावातील सर्व लोकांनी या विषयावर चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे. 
चालु वर्षी जरी कुस्ती चे मैदान रद्द झाले असले तरी पुढील वर्षी मोठे कुस्ती मैदान होईल अशी अपेक्षा करू. आणि *जगावर आलेल्या या संकटातून आत्मलिंग देवाने मुक्त करावे हिच आत्मलिंग चरणी प्रार्थना*.
•••••••••••••••••••••••••
धन्यवाद
*पै शरद पाटील* मा सरपंच
*कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य*
सांगली जिल्हा संपर्क प्रमुख

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*