आईच्या किडनीमुळे जीवदान.. मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा विक्रम... डॉ. तात्याराव लहाने
आईच्या किडनीमुळे जीवदान.. मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा विक्रम... डॉ. तात्याराव लहाने वयाच्या ३९ व्या वर्षी दोन्ही किडन्या नीकामी झाल्या, अन् डॉक्टरांनी तुमच्याकडे काहीच दिवस शिल्लक असल्याचे सांगितले, तुम्ही मरणार असे भाकीत केले. पण आईचा आशीर्वाद व आईने दिलेल्या किडनी मुळे मला पुनर्जन्म मिळाला. माझ्यासाठी आईने १६६ टाक्यांच्या वेदना सहन केल्या. अशा आयुष्यातील आलेल्या अडचणींवर मात करत "मी कसा घडलो" या विषयावर स्वर्गीय शिवाजीराव देशमुख व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आपला जीवनप्रवास उलघडला. शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड निनाई साखरचे माजी चेअरमन फत्तेसिंगराव देशमुख माजी सभापती बाळासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते. माकेगाव (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील एका गरीब घरात झालेला जन्म, आई-वडील, पाच बहिणी आणि दोन भाऊ असे तब्बल दहा माणसांचे कुटुंब, शेतमजूर वडील अशा प्रतिकूलतेवर मात करीत घरातील एकमेव शिक्षित मुलगा ते दोन लाख पाच हजार नेत्रशस्त्रक्रिया करणारा डॉक्ट...