ती… माझं घरपण…
ती… माझं घरपण…
आयुष्य जगताना आपल्याला कोणी घडवतं, आपल्याला प्रेम देतं, आपल्यासाठी स्वतःला झिजवतं ते आपले आई-वडील— हे सगळं समजायला वेळ लागतो. पण एकदा हे लक्षात आलं की, त्या व्यक्तीकडे पाहताना डोळे नकळत भरून येतात…आपल्यावर कोणी प्रेम करत असेल तर ती व्यक्ती म्हणजे आपली धर्म पत्नी , बायको
२० एप्रिल २००६ रोजी ती माझ्या आयुष्यात आली.
१९ वर्षांचा हा एकत्रचा प्रवास – सहज नव्हता.
सुख होते, दु:ख होतं, परीक्षा होत्या…
पण एका गोष्टीवर मात्र कधीच तक्रार नाही आली — तिच्या समर्पणावर, तिच्या निष्ठेवर
माझ्या वडिलांच्या निधनानंतर, तीने संपूर्ण घराला आपलं घर मानलं. तिने माझ्या आईला "आई" म्हटलं ते मुखाने नव्हे तर मनाने. माझ्या भावांना आपले भाऊ मानलं, वहिनींना बहीण.
— कोणतेही नाटक नाही, कोणताही बनाव नाही… फक्त प्रामाणिक प्रेम आणि मनापासूनची आपुलकी.
तीने कधीही स्वतःसाठी काही मागितलं नाही.
कधी हट्ट नाही, कधी तक्रार नाही.
*तिचं हसू हेच तिचं हत्यार* – *आणि तेच आमचं बळ*.
कितीही कामाचा ताण असो, चेहरा कायम हसरा.
घरात सर्वांशी ज्या पद्धतीने ती वागत आली आहे, ते पाहून मला जाणवलं –*माझं घर "घर" आहे, कारण ती तिथं आहे*.
ती मला कधी म्हणाली नाही, “तू मला काही देत नाहीस,”
कारण ती माझ्याकडून काही अपेक्षा करतच नाही.
तिला फक्त साथ हवी असते — *आणि ती मी कितपत दिली, हा प्रश्न मात्र कायम मनात राहतो*.
ती काही मागत नाही, पण कधीबधी बाहेर गेलो की, एका साध्या *आईस्क्रीमचा हट्ट करते* — तेवढाच हक्क तिच्या डोळ्यांत दिसतो.
तिला फिरायला फारसं आवडत नाही, पण अंत्रीचं *स्वामीधाम* हे तिचं श्रद्धास्थान. म्हणून तिथं गेलं की, तिच्या चेहऱ्यावर खरा शांत आनंद दिसतो.
आज तिचा वाढदिवस –
*१९ ऑक्टोबर* – म्हणून तिच्यासाठी हे शब्दरूप भेटवस्तू देतोय.
कारण इतक्या वर्षांत मी कधीच स्पष्टपणे सांगू शकलो नाही,
"*तू आहेस म्हणून मी आहे*.
*तू आहेस म्हणून हे घर, घर आहे*.
आणि *तू आहेस म्हणून आयुष्य सुंदर वाटतं*."
🙏 *स्वामी चरणी एकच प्रार्थना* –
जी स्त्री माझ्या कुटुंबाचा आत्मा बनली,
जीने प्रत्येक नातं जीवापाड जपलं,
तिला मी कधीच काही देऊ शकलो नाही,
पण परमेश्वर तिला माझ्यापेक्षा दुप्पट आयुष्य, सुख, आणि समाधान देवो.
🌹 *वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा*,
माझ्या आयुष्याच्या खरीखुरी अर्धांगिनीला! 🌹
Comments
Post a Comment