*सोंडोलीमध्ये रंगणार दोन महाराष्ट्र केसरींची तुफानी दंगल देवा थापा स्पर्धेचे खास आकर्षण*



*सोंडोलीमध्ये रंगणार दोन महाराष्ट्र केसरींची तुफानी दंगल
देवा थापा स्पर्धेचे खास आकर्षण*
*मनोजकुमार मस्के, मांगरूळ*
 
श्री नायकेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त ग्रामस्थ मंडळ सोंडोली (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) आणि रोज मर्क लिमिटेड, जाधव रोज मर्क स्पोर्ट्स प्रा. लि. तसेच एमिरेट्स होल्डिंग ग्रुप, दुबई यांच्या सौजन्याने सोमवार, दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी भव्य ‘रोज मर्क केसरी’ आणि ‘सोंडोली केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्ती रसिकांसाठी हा एक अविस्मरणीय क्षण ठरणार असून दोन महाराष्ट्र केसरी पैलवानांमधील थरारक लढत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान हे स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणार आहेत. या भव्य स्पर्धेचे आयोजन सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा. चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, नाईकबा यात्रा कमिटी (मुंबईकर) व ग्रामस्थ मंडळ, सोंडोली यांनी केले आहे.

मुख्य कुस्ती: दोन महाराष्ट्र केसरी आमने-सामने, पहिल्या नंबरसाठीची मुख्य कुस्ती रोज मर्क लिमिटेड यांच्या सौजन्याने कै. मारुती सावंत (शेठ) आणि कै. मारुती पाटील (सेक्रेटरी) यांच्या स्मरणार्थ आयोजित केली आहे. या लढतीत पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी) विरुद्ध हर्षवर्धन सदगीर (महाराष्ट्र केसरी) अशी धडाकेबाज झुंज रंगणार आहे. ‘रोज मर्क केसरी’  विजेत्याला रोज मर्क लिमिटेड तर्फे मानाची चांदीची गदा आणि रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

विशेष आकर्षण: स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे नेपाळचा लोकप्रिय आणि ताकदवान पैलवान देवा थापा विरुद्ध भारताचा आक्रमक पैलवान अमित लाखा यांची अतिउत्सुकतेची लढत. ही कुस्ती जाधव रोज मर्क स्पोर्ट्स प्रा. लि. चे संचालक दत्तात्रय जाधव यांनी पुरस्कृत केली आहे.

एमिरेट्स होल्डिंग ग्रुप पुरस्कृत, कै. दगडू जाधव व कै. राजाराम जाधव यांच्या स्मरणार्थ ‘सोंडोली केसरी’ ही कुस्ती देखील रंगणार आहे. या लढतीत महाराष्ट्र चॅम्पियन सतपाल सोनटक्के विरुद्ध समीर शेख अशी प्रेक्षकांना थरारक झुंज पाहायला मिळणार आहे. विजेत्याला रोज मर्क लिमिटेड तर्फे मानाची चांदीची गदा आणि रोख इनाम देण्यात येणार आहे.

इतर रोमांचक लढती: कुमार पाटील (कोल्हापूर) वि. सुनील कवठे (सांगली), सुरज पाटील (शित्तूर) वि. हरी मार्कंड (कोल्हापूर), साहिल पाटील (सोंडोली) वि. धनाजी पाटील (पुणे), अजय शेडगे (शेडगेवाडी) वि. प्रदीप ठाकूर (सांगली)
महिला कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष लढत: वैष्णवी शंकर पाटील (सोंडोली) वि. पौर्णिमा गुरव (आरळा). या दंगलमध्ये सुमारे १०० हून अधिक पैलवान सहभागी होणार आहेत.

रोज मर्क लिमिटेड चे संचालक पूर्वेश शेलटकर म्हणाले, “सोंडोली आणि कोल्हापूर जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांची कुस्ती परंपरा लाभली आहे. त्या मातीतल्या कुस्ती संस्कृतीला प्रोत्साहन देताना आम्हाला अभिमान वाटतो.”

एमिरेट्स होल्डिंग ग्रुप चे उद्योगपती काझी अब्दुल मतीन (दुबई) म्हणाले, “भारताच्या लाल मातीतील कुस्ती खेळ मला अत्यंत आवडतो. तरुण पिढीला घडविण्यासाठी हा खेळ मोठी भूमिका निभावेल, म्हणून मी या दंगलसाठी स्वतः उपस्थित राहणार आहे.”

विशेष आकर्षण:  रोज मर्क लिमिटेड यांच्या तर्फे विजेत्यांसाठी मानाची चांदीची गदा आणि रोख पारितोषिके. सुनील नागरपोळे यांची पारंपरिक हलगी. ईश्वर पाटील आणि सुरेश जाधव यांचे ऐतिहासिक निवेदन. संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण. प्रेक्षकांसाठी मिनी खासबाग मैदान स्वरूपातील व्यवस्था.

प्रमुख पाहुणे म्हणून  काझी अब्दुल मतीन (उद्योगपती, दुबई), हिंद केसरी रोहित पटेल, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, पूर्वेश शेलटकर, हिमांशू गांधी, शैलेश पेठे (रोज मर्क लिमिटेड), पत्रकार विजय चोरमारे, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, डी. आर. जाधव (आण्णा), पत्रकार संपत मोरे, सर्जेराव माईंगडे, दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

*दिनांक: सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५, वेळ: दुपारी २ ते रात्री ९, स्थळ: मिनी खासबाग मैदान, सोंडोली, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर*


Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....