*मोरेवाडी गावात उपसरपंचपदी संजय आकाराम कटके यांची बिनविरोध निवड*
*मोरेवाडी गावात उपसरपंचपदी संजय आकाराम कटके यांची बिनविरोध निवड*
*लोकशाही प्रक्रियेला चालना देणारी ऐतिहासिक निवड*
मांगरूळ वार्ताहर
शिराळा तालुका येथील मोरेवाडी गावामध्ये नुकतीच उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले संजय आकाराम काटके यांची एकमताने उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड गावाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण मानली जात असून अनेक वर्षांनी ग्रामसभेच्या लोकशाही प्रक्रियेतून अशा पद्धतीची निवड पार पडली आहे.
गावच्या विकासासाठी एकत्रित काम करण्याच्या उद्देशाने आणि गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर झालेल्या सहमतीनुसार, उपसरपंच पदाचा कार्यकाळ अडीच अडीच वर्षांचा ठेवण्यात आला होता. त्या अनुषंगाने, पहिल्या अडीच वर्षांसाठी संदीप दगडू सावंत यांनी उपसरपंच म्हणून काम पाहिले. आता उर्वरित कार्यकाळासाठी संजय काटके यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या निवड प्रक्रियेसाठी गावाच्या सरपंच लक्ष्मी लक्ष्मण डिगे, माजी सरपंच आशोक डिगे उपसरपंच संदीप दगडू सावंत, इतर सर्व सदस्य, ग्रामसेवक, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. सर्व सदस्यांच्या एकमताने ही निवड झाली असून ग्रामस्थांनी संजय काटके यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
संजय काटके हे कृषिप्रधान कुटुंबातून आलेले असून, त्यांनी नेहमीच ग्रामीण भागाच्या विकासासाठी सातत्याने कार्य केले आहे. यापुढेही गावच्या पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण व आरोग्य यासारख्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करून विकासाला चालना देण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
गावकऱ्यांनी या निवडीचे स्वागत करत संजय काटके यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment