"*श्रद्धेचं नातं – प्रशांत सर, अक्षय भाऊ आणि चिंचेश्वर मंदिर*"
"*श्रद्धेचं नातं – प्रशांत सर, अक्षय भाऊ आणि चिंचेश्वर मंदिर*"
नवरात्रीच्या मंगलमय उत्सवात, चिंचेश्वर मंदिरात एका खास भेटीने वेगळंच तेज आलं… अक्षय आत्माराम पाटील भाऊ (मांगरूळ) – कै. आत्माराम दादांचे चिरंजीव – आपल्या गावाच्या आणि मंदिराच्या सेवेत नेहमीच तत्पर असनारे. या वर्षी त्यांच्या सोबत आले होते ठाणा महानगरपालिकेत अधिकारी पदावर कार्यरत असलेले प्रशांत अंकुश गुरव –गाव रत्नागिरी येथील, पण मनाने पूर्णपणे चिंचेश्वर देवाच्या भक्तीत एकरूप झालेले.
प्रशांत सर आणि चिंचेश्वर देव यांचं नातं काही आजचं नाही. कै. आत्माराम दादा असताना, प्रशांत सरांनी मंदिर परिसरात खोली बांधण्यासाठी *50 हजार रुपयांची* मोलाची देणगी दिली होती. तेव्हापासून देव आणि भक्त यांच्यातला एक अदृश्य पण अतूट धागा तयार झाला.
या वर्षी त्यांनी नवरात्रीच्या फराळ वाटप उपक्रमासाठी तब्बल १०,००० रुपयांची देणगी दिली. त्यांचं हे योगदान केवळ आर्थिक नव्हतं, तर त्यामागे असलेली श्रद्धा, प्रेम आणि सहभागाची जाणीवही तितकीच मोठी होती. त्यांनी या उपक्रमाचं केवळ कौतुकच केलं नाही, तर स्वतः मंदिरात हजर राहून अक्षय दादांसोबत मायमाऊलींना फळांचे वाटप देखील केलं.
फराळ घेताना ज्येष्ठ माता-भगिनींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद – तो त्यांनी अगदी मनापासून अनुभवला आणि म्हटलं,
> “अशा उपक्रमांची गरज आहे, आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत!
या श्रद्धेच्या आणि स्नेहाच्या खूप सुंदर आठवणी म्हणून, प्रशांत सरांना *चिंचेश्वर देवाची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली*. आज ती प्रतिमा त्यांच्या घरात भिंतीवर असेल, पण त्यातून वाहणारी चिंचेश्वराची ऊर्जा, आशीर्वाद आणि भक्तीची भावना त्यांच्या हृदयात गाभ्याशी कोरली गेली आहे.
*त्यांनी एका ठाम शब्दांत म्हटलं* –
*“*फराळवाटप ग्रुप काहीतरी वेगळं करत आहे. केवळ वाढदिवस, सेलिब्रेशन, की फक्त हुल्लडबाजी यासाठी ग्रुप नकोत – समाजासाठी, संस्कृतीसाठी काहीतरी देणारे ग्रुप असावेत. तुमचा हा उपक्रम खरोखर प्रेरणादायक आहे*.”
त्यांच्या या उद्गारांनी आणि उपस्थितीने आम्हाला केवळ आनंदच नव्हे, तर नव्या उमेदीने आणि जबाबदारीने काम करण्याची दिशा दिली.
प्रशांत सर आणि अक्षय दादा यांच्यासारख्या व्यक्तींच्या सहकार्यामुळे, चिंचेश्वर देवाच्या पवित्र सान्निध्यात आम्ही जी सेवा करतो, ती अधिक अर्थपूर्ण आणि सच्ची ठरते.
> *हे श्रद्धेचं, सेवाभावाचं आणि आपल्या देवाशी असलेल्या नात्याचं निखळ प्रतिबिंब आहे*.
Comments
Post a Comment