*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....
*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....
तसा माझा आणि राजकारणाचा फारसा संबंध नसतोच मुळी. बऱ्याचदा बातम्या पाहिल्यानंतर काही ठराविक नेत्यांचे चेहरे मात्र नेहमीच लक्षात राहतात. टीव्हीवर बघितल्यानंतर कधी कधी त्यांचा स्वभाव आपण अंदाजाने बांधत असतो. कारण समोरासमोर कधी आपली आणि त्यांची भेट झालेली नसते. टीव्हीवरील बातम्या ऐकून त्यांच्याबद्दलचं मत आपण व्यक्त करत असतो. बऱ्याचदा अनेक व्यक्तींशी ज्या वेळेला आपण स्वतः भेटतो त्यावेळेला आपल्याला कळते अरे ही व्यक्ती तर इतरांपेक्षा फार वेगळी आहे. असंच काहीसं माझ्या बाबतीत घडलं. परवा मेडिकलच्या संदर्भात मी केंद्रीय मंत्री नारायण राणेसाहेबांना भेटण्याचा योग आला. आधी तर खूपच भीती वाटत होती. साहेब फार कडक आहेत काय म्हणतील ... माझ्या मनावरती दडपण होतं. परंतु मी त्यांना समोर भेटलो त्यावेळी कळलं की ज्या माणसाबद्दल माझं मन भीत होतं, तो माणूस अगदी लोण्याच्या गोळ्यासारखा मऊ आहे. दोन शब्दातच मला त्यांनी आपलं केलं. माझ्या मनातील पूर्ण भीतीच गायब झाली, अगदी माझे आणि त्यांची पहिली ओळख असल्यासारखं अगदी घरच्यासारखं माझ्याशी ते बोलले.. मला विश्वास बसत नव्हता.. मी नारायण राणे साहेबांशी बोलतोय... माझ्या आयुष्यातली ही पहिली गोष्ट असेल, जी एवढ्या मोठ्या व्यक्तीने एवढ्या सामान्य माणसाशी, इतक्या सामान्यपणे केलेलं वक्तव्य मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. मला अनेक वेळा वाटत होतं की डायरेक्ट ताडफाड बोलणारी व्यक्ती आपल्याशी सहजासहजी बोलेल वाटलं नव्हतं. परंतु ताडफाड बोलणारी व्यक्ती ही स्पष्ट आणि खरं बोलते हे त्यांना भेटल्यानंतरच कळत. जोपर्यंत आपण राणे साहेबांना भेटू शकत नाही तोपर्यंत आपल्या मनावरती दडपणच राहणार... परंतु एकदा का तुम्ही या व्यक्तीशी भेटलात की पुन्हा जगातल्या कुठल्याही गोष्टीची भीती राहणार नाही एवढं मात्र नक्की . खरंच खूप बरं वाटलं राणे साहेबांना भेटल्यानंतर त्यांच्या घरातील त्यांच्या धर्मपत्नी आमच्या मातोश्री यांचाही स्वभाव अतिशय मऊ आणि मवाळकीचा होता. आम्ही वसंतदादा पाहिले नाहीत आम्ही बाळासाहेबांना भेटलो नाही परंतु जसे त्यांना आम्ही वाचले तसेच राणे साहेब आम्हाला भासले... एवढं मात्र नक्की !
धन्यवाद
किरण मस्के - 9029978825
Comments
Post a Comment