शिराळा उत्तर भागातील बुलंद आवाज...अजाद शत्रू , कृष्णा लाला नलवडे (भाऊ)

शिराळा उत्तर भागातील बुलंद आवाज...अजाद शत्रू , कृष्णा लाला नलवडे (भाऊ)


मनोजकुमार  मस्के, मांगरूळ

नागपंचमीचे ३२, शिराळा, प्रसिद्ध असणारा हा तालुका आहे. आणि याच तालुक्यातील प्रसिद्ध असणारे देवस्थान गिरजवडे ज्योतिबा, या जोतिबाच्या पायथ्याशी असणारे एक सामान्य गाव म्हणजे गिरजवडे  याच गावातील सामाजिक कामासाठी अविरतपणे वाहून घेतलेले व आमदार सत्यजित देशमुख यांचे विश्वासू कार्यकर्ते सर्वांचे लाडके सर्वसामान्यांना सदैव सेवा देण्यास बांधील असणारे सर्वांचे मित्र व समाजसेवक कृष्णा नलवडे (भाऊ) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! एकदम सच्चा दिलाचा दिलदार, तोंडावर रोखठोक बोलणं पटलं तर ठिक, नाही पटलं तर त्याहुन ठीक माननारा कृष्णा भाऊ . यांची ओळख तशी शिराळा उत्तर भागासह संपूर्ण शिराळा तालुक्यात आहे.
एक जून रोजी कृष्णा भाऊंचा वाढदिवस ज्योतिबाच्या पावन स्पर्शाने व रेणुका मातेच्या आशीर्वादाने एका सामान्य कुटुंबात कृष्णा भाऊंचा जन्म झाला. घरची परिस्थिती गरिबीची त्यातच वडार समाज असल्याने हातावरचे पोट अशा परिस्थितीत कृष्णा भाऊंचा जन्म 1जून 1990 साली गिरजवडे गावी झाला. 2007 ला ते बारावी पास झाले आणि 2008 ते 2010 या कालावधीत ते सिमेंट कंपनीमध्ये हमाली करू लागले. त्यांचे प्रामाणिक काम आणि मेहनत पाहून याच कंपनीत 2010 ते 2017 सुपरवायझर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गरिबीची जाण असल्याने कृष्णा भाऊंनी समाजसेवेचे कार्य हाती घेतले. प्रत्येक माणसाशी नाते जोडत अनेक माणसं या माणसाने जोडून ठेवली. नेहमी दुसऱ्यासाठी काम करणारा कृष्णा भाऊ स्वतःसाठी मात्र रिकामाच असतो. महाभारतातील कृष्णाप्रमाणे अनेकांची रथ यांनी स्वतःहून हाकले परंतु कधीही नेता म्हणून नव्हे तर ते कार्यकर्ता म्हणूनच राहिले. समाजात केलेल्या चांगल्या कामाची दखल घेत 2019 ला ओड (वडार)काम्युनिटी कौन्सील ऑफ इंडिया या वडार समाज्याच्या राष्ट्रीय संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली. सिमेंट कंपनीत काम करत करत कामाचा प्रचंड अनुभव घेऊन 2021 पासून स्वतःचा  व्यवसाय त्यांचे आजोबा कै. ह. भ. प. रघुनाथ आण्णा नलवडे हे त्यांचे आजोबा असून त्यांचा नावाने व्यवसाय चालू केला रघुनाथ महाराज सप्लायर्स  या नावाने खडी, क्रशसंड, तसेच बिल्डिंग मटेरियल सप्लायर म्हणून चालू केले. उत्तर विभागात गिरजवडेपासून शिराळ्यापर्यंत व शिराळ्यापासून वाकुर्डेपर्यंत कोणत्याही गावात कृष्णा नलवडे या व्यक्तीला प्रत्येक जण ओळखतात तर ते राजकीय म्हणून नव्हे तर एक सामान्य कार्यकर्ता आणि मित्र म्हणून. गेली सोळा वर्षे झाली सत्यजित देशमुख यांचा हा एक विश्वासू कार्यकर्ता म्हणून सर्वत्र यांची ओळख आहे. एक सच्चा दिलाचा प्रामाणिक माणूस अनेकांचे मित्र व मार्गदर्शक असल्याचे, मोठे भाग्यच मानावे लागेल. आज या दाणतदार व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....