*भारत विरुद्ध अमेरिका कडवे कुस्ती मैदानावर जागतिक लढत!* पृथ्वीराज पाटील विरुद्ध रिकार्डो सेंटेनो यांच्यात होणार जंगी कुस्ती!
*भारत विरुद्ध अमेरिका कडवे कुस्ती मैदानावर जागतिक लढत!*
पृथ्वीराज पाटील विरुद्ध रिकार्डो सेंटेनो यांच्यात होणार जंगी कुस्ती!
मनोजकुमार मस्के–
शाहुवाडी तालुक्यातील कुस्तीपरंपरेने नटलेले कडवे गाव पुन्हा एकदा देशविदेशातील मल्लांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. विठलाई देवीच्या यात्रेनिमित्त , ग्रामपंचायत कडवे, यात्रा कमिटी आणि मुंबईस्थित ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ७ मे २०२५ रोजी जंगी कुस्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाचा हा कुस्ती मेळावा खास ठरणार आहे कारण भारत विरुद्ध अमेरिका यांच्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्तीची लढत होणार आहे.
भारताचे नॅशनल चॅम्पियन पृथ्वीराज पाटील, महाराष्ट्र केसरी विरुद्ध अमेरिकेचे वर्ल्ड चॅम्पियन रिकार्डो सेंटेनो या दोन बलाढ्य मल्लांमध्ये थरारक मल्लयुद्ध रंगणार आहे.
कुस्तीची शान उंचावणाऱ्या लढती: नं. २ लढत कर्नाटक केसरी कार्तिक काटे विरुद्ध विक्रांत सोनीपल (हरियाणा), नं. ३ लढत कुमार पाटील (शित्तूर) विरुद्ध अजित पाटील (शाहुवाडी) विशेष लढत सुरज पाटील (शित्तूर) विरुद्ध सुरज जाधव (कडेगाव).
या प्रमुख कुस्त्यांव्यतिरिक्त ७० हून अधिक कुस्त्या रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. संपूर्ण तालुक्यात आणि पंचक्रोशीत कडवे हे कुस्ती मातीचे लेणं म्हणून ओळखले जाते. जुन्या काळापासून येथे देशभरातले मात्तबर मल्ल याच मातीत घडले आहेत. गावाचे ग्रामदैवत विठलाई देवीच्या साक्षीने हे पारंपरिक खेळ टिकून आहेत.
बुधवार, ७ मे २०२५, स्थळ: जंगी कुस्ती मैदान, मौजे कडवे, वेळ: दुपारी २ वाजता या कुस्त्या होणार आहेत.
यावेळी विजय खोत यांनी बोलताना सांगितले कि कुस्तीशौकिनांसाठी हा एक पर्वणीचा क्षण आहे. अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय मल्लयुद्ध ग्रामीण पातळीवर होणे हे अभिमानास्पद आहे. यात्रा कमिटी कडवेकर ग्रामस्थांनी सर्व भाविक, कुस्तीप्रेमी आणि पंचक्रोशीतील नागरिकांना या भव्य कुस्ती मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment