"*सहकार्याचा एक सहवास – तुमच्यामुळेच हे शक्य झालं*..." २००६ साली सुरू झालेला नवरात्रीच्या फराळ वाटपाचा उपक्रम – सुरुवातीला केवळ एक छोटा प्रयत्न वाटला होता. पण आज, जवळपास दोन दशके पूर्ण होत आली, आणि जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येतं की ही यशोगाथा केवळ एखाद्या व्यक्तीची नाही, तर संपूर्ण मांगरूळ गावाच्या एकतेची, सहकार्याची आणि सेवाभावी वृत्तीची आहे. आज या उपक्रमामागे उभे आहेत – गावातील समर्पित कार्यकर्ते, फराळ वाटप ग्रुपमधील हरहुन्नरी मंडळी, आणि वर्षानुवर्षे मदतीचा हात पुढे करणारे देणगीदार. कुणी आर्थिक मदत दिली, कुणी वेळ आणि श्रम दिले, तर कुणी सामान पुरवून या कार्यक्रमात आपली भूमिका बजावली. पण सर्वांचं एकच ध्येय होतं – नवरात्रीच्या पवित्र उत्सवात सर्वांना सामावून घेणं आणि स्त्रीशक्तीचा सन्मान करणं. या उपक्रमाच्या प्रत्येक टप्प्यात गावाचा एकोपा दिसून आला. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून अखेरच्या दिवसापर्यंत, कार्यकर्त्यांनी अपार उत्साहाने आणि मनापासून काम केलं. उपवास करणाऱ्या माता-भगिनी आणि पुरुषांसाठी फराळाचे आयोजन इतकं सुरळीत केलं गेलं की कुणालाही थकवा ...