*शिरशी येथे आज प्रा. शिवव्याख्याते अरुण घोडके यांचे व्याख्यान*
*अक्षररुपी जात व्यवस्था संपवण्यासाठी शिरसी ग्रामपंचायतचा पुढाकार शिक्षक व कर्मचारी यांचा कौतुक सोहळा..
प्रा. शिवव्याख्याते अरुण घोडके यांचे व्याख्यान*
मांगरूळ वार्ताहर
आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता शिरसी येथे प्राध्यापक शिवव्याख्याते कारण यांचे व्याख्यान होणार आहे त्याचबरोबर गावातील विविध योजना तसेच अनेक उपक्रम याचीही माहिती त्यानिमित्त मान्यवरांना देण्यात येणार आहे. तसेच शिक्षक कर्मचारी यांचा कौतुक सोहळा आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते पार पडणार आहे.
मौजे शिरसी तालुका शिराळा या ग्रामपंचायतीने पुरोगामी महाराष्ट्रात अक्षररुपी जातीव्यवस्था मोडून एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे
11 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णय नुसार राज्यातील अनेक शहरातील व ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नांवे जातीवाचक असल्याची बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नसल्यामुळे राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृध्दींगत होण्याच्या दृष्टीने अशा सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नांवे बदलून जातीवाचक नावांऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नांवे देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातलं वैभव महाराष्ट्राची परंपरा व स्वराज्यातील इतिहासाचे साक्षीदार गडकोट किल्ले यांच्या प्रति जाणीव जागृती व व्याप्ती व नव्या पिढीला किल्ल्यांविषयी आकर्षण निर्माण होण्याकरता गावातील जातिव्यवस्थेवर आधारित असलेल्या गल्ल्याना किल्ल्यांची नावे देऊन समाजापुढे एक सकारात्मक व विधायक बदलाचा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे. या उपक्रमाचे संपूर्ण शिराळा तालुका व परिसरात सर्व स्तरावर कौतुक होत आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन शिराळा विधान सभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यनिष्ठ आमदार आदरणीय सत्यजित देशमुख यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता आयोजित केले असून या कार्यक्रमानंतर शिवव्याख्याते अरुण घोडके यांचे महाराष्ट्रातील शिवकालीन गड किल्ले व स्वराज्यातील त्यांचे महत्त्व या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे साक्षीदार होण्याकरता शिराळा व परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहणे बाबत शिरसी ग्रामपंचायत सरपंच सौ स्मिता भोसले यांनी आवाहन केलेले आहे
Comments
Post a Comment