Posts

Showing posts from February, 2025

कै. हिराबाई भीमराव पाटील

Image
आपणास कळविण्यास अत्यंत दुःख होते की आज दिनांक 24 /2/ 25 रोजी पहाटे ४.०० वाजता कै.  हिराबाई भीमराव पाटील रा. मांगरूळ यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांचे वय. ७७ वर्ष  होते. कृष्णराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन संग्रामसिंह पाटील व माजी विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील यांच्या त्या चुलत्या होत्या, तर अजित भीमराव पाटील व रणजीत पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या. रक्षा विसर्जन शुक्रवार दिनांक 28 2 2025 रोजी सकाळी दहा वाजता मांगरूळ येथे होणार आहे.

महाराष्ट्र केसरी : कुस्तीच्या भविष्याचा विचार कधी होणार?

Image
"महाराष्ट्र केसरी : कुस्तीच्या भविष्याचा विचार कधी होणार?" मनोजकुमार मस्के, मांगरूळ  ९८९०२९१०६५ महाराष्ट्रातील पैलवानांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जागतिक स्पर्धेपेक्षा मोठी वाटू लागली आहे. कुस्तीचीच तालीम, त्यांचेच गुरुजी, तेच आयोजक आणि तेच पैलवान  मग वाद का होतो?  ही बाब संशोधनाचा विषय असली, तरी त्यात पडण्याची गरज नाही. खरं तर खेळाडूंनी मैदानाबरोबरच स्पर्धाही खेळणे महत्त्वाचे आहे. जगभरात कुस्ती खेळणाऱ्या देशांची संख्या २०० च्या वर आहे, तर केवळ १६ देश क्रिकेट खेळतात. तरीसुद्धा भारतात क्रिकेटला अधिक महत्त्व दिले जाते.   पूर्वीच्या काळात कुस्तीला विशेष मान होता. महाराष्ट्रातील मल्ल देश-विदेशात ख्यातीस पात्र ठरले होते. दिल्लीतून कोणी पैलवान महाराष्ट्रात कुस्तीसाठी आला की, महाराष्ट्राच्या मल्लांनी त्याला पराभूत केल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र, आज परिस्थिती वेगळी आहे. *महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा सन्मान मिळत असला, तरी आंतरराष्ट्रीय कुस्तीपेक्षा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचेच अधिक कौतुक होत आहे, हे दुर्दैव आहे*. महाराष्ट्रातील पैलवाना...

*शिरशी येथे आज प्रा. शिवव्याख्याते अरुण घोडके यांचे व्याख्यान*

Image
*अक्षररुपी जात व्यवस्था संपवण्यासाठी शिरसी ग्रामपंचायतचा पुढाकार शिक्षक व कर्मचारी यांचा कौतुक सोहळा.. प्रा. शिवव्याख्याते  अरुण घोडके यांचे व्याख्यान*  मांगरूळ वार्ताहर  आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता शिरसी येथे प्राध्यापक शिवव्याख्याते कारण यांचे व्याख्यान होणार आहे त्याचबरोबर गावातील विविध योजना तसेच अनेक उपक्रम याचीही माहिती त्यानिमित्त मान्यवरांना देण्यात येणार आहे. तसेच शिक्षक कर्मचारी यांचा कौतुक सोहळा आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते पार पडणार आहे.  मौजे शिरसी तालुका शिराळा  या ग्रामपंचायतीने पुरोगामी महाराष्ट्रात अक्षररुपी जातीव्यवस्था मोडून एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे 11 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णय नुसार राज्यातील अनेक शहरातील व ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नांवे जातीवाचक असल्याची बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नसल्यामुळे राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृध्दींगत होण्याच्या दृष्टीने अशा सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नांवे बदलून  ...