*दै. सकाळचे शिराळा तालुका प्रतिनिधी शिवाजीराव चौगुले यांना स्वर्गीय बाजीराव बाळाजी पाटील आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन*....

*दै. सकाळचे शिराळा तालुका प्रतिनिधी शिवाजीराव चौगुले यांना स्वर्गीय बाळाजी बाजीराव पाटील आदर्श पत्रकारिता पुरस्कार  मिळाला त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन*....
मनोज मस्के - 9890291065

ज्यांच्या लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला अनेकांचे प्रश्न मार्गी लावले व अनेकांना चुकाही दाखवून दिल्या किंबहुना प्रशासनामध्ये आपल्या लेखणीचा एक धबधबा निर्माण करणारे मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारे आमचे मित्र दै. सकाळचे प्रतिनिधी , डॉ. शिवाजीराव चौगुले यांना स्वर्गीय बाजीराव बाळाजी पाटील  आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे. 
शिराळा तालुक्यातील आराळा हे शिवाजीराव चौगुले यांचे मूळ गाव. घरची परिस्थिती अतिशय गरीबीचे त्यातूनच त्यांनी डॉक्टर पर्यंत शिक्षण पूर्ण केले. पहिल्यापासूनच समाजसेवेची प्रचंड आवड. त्यांनी आपल्याच गावात एक छोटंसं क्लिनिक चालू केले.  अनेक पेशंटला तर ते पैसे न घेताच उपचार करत असत.   वाचनाची प्रचंड आवड असल्याने आपण समाजाचे  प्रश्न लिहावे समाजाची व्यथा मांडाव्या या हेतूने त्यांनी लिहायला सुरुवात केली. खरतर पत्रकारतेचा अनुभव त्यांच्याजवळ नव्हता परंतु लिखाणाचा एक नाद त्यांना जडला होता. सुरुवातीला तरुण भारत या दैनिकात काम करत होते. त्यानंतर त्यांनी सकाळ या वृत्तपत्राला काम करण्यास सुरुवात केली. प्रत्येक गोष्ट स्वतःहून तपासून त्यातील बारकावे काढून मगच ती समाजापर्यंत पोहोचवणे त्यात सत्यता आणि तथ्यता असणे हे नेहमीच शिवाजीराव चौगुले यांनी जपलेले आहे. समाजासाठी नेहमीच त्यांची तडफड ही अग्रेसर असते. ग्रामीण भागातील तळागाळातील प्रश्न मांडून त्याला वाचा फोडणे आणि गरिबातल्या गरिबाला त्याचा हक्क मिळवून देणे इथपर्यंत ते काम करत असतात. खऱ्या अर्थाने आज त्यांच्या कामाची पोच पावती या पुरस्काराच्या माध्यमातून शिवाजीराव चौगुले यांना मिळाली म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*