स्वर्गीय शिवाजीराव देशमुख व्याख्यानमालेचे पहिले पुष्प
कोकरुड ता. शिराळा येथे स्वर्गीय शिवाजीराव देशमुख व्याख्यानमालेचे पहिले पुष्प "मोगरा फुलला" एकभक्तीमय संध्याकाळ या प्रबोधनकार गणेश शिंदे व गायिका सन्मिता धापटे-शिंदे यांच्या बहारदार सांसंस्कृतीक कार्यक्रमाने पार पडले. शिंदे यांनी अभंगवाणीतून ज्ञानेश्वर माऊलीचे जीवन चरित्र रेखाटले. यावेळी आमदार सत्यजित देशमुख, निनाई साखरचे माझी चेअरमन फत्तेसिंगराव,देशमुख माजी सभापती बाळासाहेब पाटील, संपतराव देशमुख, प्रमुख उपस्थित होते.
शिंदे यांनी ज्ञानेश्वरांच्या जीवनावर सकोल प्रवचन करत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ते आपल्या प्रबोधनात म्हणाले, आपल्या जीवनात सर्वात जास्त प्रेम आपल्यावर आई-वडील करतात. तेव्हा आई-वडील मुलगा मुलगी ही नाती जपा, आई-वडिलांची मान शर्मिने खाली जाईल असे कोणते कृत्य करू नका. जीवनात डोकावून पहा की कधी आपण कोणाची वाईट तरी केले नाही ना, कारण केलेले कर्म हे तितक्याच वेगाने परत येत असते.
आमदार सत्यजित देशमुख म्हणाले गेली सात वर्षे या व्याख्यानमालातून तरुण पिढीमध्ये सशक्त सांस्कृतिक मूल्ये रुजविण्यावर भर दिला जात आहे. “आपल्या भावी पिढ्यांना चांगल्या संस्कारांचा पाया द्यायचा असेल तर आपल्या संतांच्या शिकवणीला पर्याय नाही. या अनमोल साहित्याचा अभ्यास आणि अनुभव घेण्याची गरज असुन,यावर भर देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सुप्रसिद्ध गायिका सन्मिता धापटे-शिंदे यांनी सहकाऱ्यांसह आपल्या सुमधुर वाणीतून "भ्रमरा रे भ्रमरा," “मोगरा फुलाला,” “आळंदी हे गाव,” “अबीर गुलाल” "या पंढरपुरात लगिन देवाच" "कानडा राजा पंढरीचा" आणि “भोलावा विठ्ठल” यांसारख्या भक्तिगीते आणि अभंगांच्या सादरीकरणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या भावपूर्ण वाणीने संत ज्ञानेश्वरांच्या शिकवणीचे आध्यात्मिक सार जिवंत केले.
प्रारंभी स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या प्रतिमेस अभिवादन करत, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत संजय घोडे, प्रास्ताविक प्रा.ए. सी पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख विश्वास घोडे यांनी केली.
या कार्यक्रमास माजी सभापती हणमंतराव पाटील सुखदेव पाटील,रेणुकादेवी देशमुख,सरपंच अनिता देशमुख उपसरपंच अंकुश नांगरे,अनिल देशमुख विकास नांगरे,श्रीरंग नांगरे, विकासराव देशमुख, ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट, नंदकुमार पाटील,पोपट पाटील,मोहन पाटील,सुरेश घोडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment