मांगरूळ मध्ये क्रिकेटचे सरावासाठी आणली सराव जाळी
मांगरूळ मध्ये क्रिकेटचे सरावासाठी आणली सराव जाळी
मांगरूळ येथे क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी एकत्र येऊन क्रिकेट सराव नेट आणले. हे नेट हुतात्मा स्मारक परिसरात क्रिकेट ग्राउंड करून त्यामध्ये बांधण्यात आलेले आहे. सोमवार दि. 13 रोजी या सराव जाळीचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य भगवान मस्के, पैलवान विकास पाटील, महादेव खांडेकर, गोपाळ लोहार, पोपट मस्के, सुनील खांडेकर, राजाराम जोशी, अभिजीत मस्के यांच्या उपस्थितीत केले. मांगरुळ येथील क्रिकेट वेड्या मुलांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील मुलांना नेटमध्ये क्रिकेट खेळण्यास व सराव करण्यास मदत होईल या उद्देशाने हे नेट बांधण्यात आले असल्याचे सांगितले. सध्या क्रिकेटचे वेड अनेक गावात मोठ्या प्रमाणात असल्याने प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा क्रिकेटचे नियम जाणून घेण्यासाठी या नेटचा उपयोग होईल असे मांगरूळ येथील युवकांनी सांगितले. क्रिकेटचे नियम आणि क्रिकेट खेळण्यासंदर्भात ग्रामीण भागातील मुलांना कुठे सुविधा नाहीत याचा विचार करून या मुलांनी हे पाऊल उचललेले दिसते. दररोज प्रॅक्टिस करत असताना अनेक वेळा वेगवेगळे ठिकाणी चेंडू जाऊन इतरत्र लोकांना त्याचा त्रास होत होता तो त्रास या नेटमुळे होणार नाही व मुलांना मनसोक्त सराव करण्यासाठी उपयुक्त ठरेल या हेतूने हे नेट बांधले असल्याचे मांगरूळ प्रीमियर लीगचे युवक सांगत होते. यावेळी विक्रम खांडेकर, गोरख पाटील, शरद खांडेकर, किरण खांडेकर, दिनेश सापते, महेश मस्के, कुंडलिक खांडेकर व अनेक खेळाडू उपस्थित होते.
Comments
Post a Comment