आमदार सत्यजित देशमुख यांनी जगातील पहिल्या भाषेचा मान राखत.. आमदार झाल्यानंतर पहिली शपथ संस्कृत मधून घेतली...
आमदार सत्यजित देशमुख यांनी जगातील पहिल्या भाषेचा मान राखत.. आमदार झाल्यानंतर पहिली शपथ संस्कृत मधून घेतली...
मनोजकुमार मस्के, मांगरूळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे भाजपाचे नेते आणि शिराळा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित देशमुख यांनी संस्कृतमध्ये आमदारकीची शपथ घेतल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान सत्यजित देशमुख यांच्या शपथविधीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. संस्कृत ही जगात पहिली बोलली जाणारी भाषा म्हणून ओळखली जाते. भारत हा पूर्वी भक्तीप्रधान देश होता म्हणूनच येथे प्रत्येक युगात देव, देवी आणि भगवान सर्वशक्तिमान मानले जातात. जगातील कोणत्याही देशाला असा इतिहास नाही. म्हणूनच, भारताला महान भूमी, योगभूमी, म्हटले जाते. संस्कृत ही देव, देवी आणि भगवान यांचीही भाषा मानली जाते. खऱ्या अर्थाने सत्यजित देशमुख यांनी जगातील पहिल्या भाषेचा मान ठेवत, देवाधिकांच्या काळातील भाषेत शपथ घेत, आपणाला निवडून दिलेल्या जनतेशी प्रामाणिक राहून सेवा करेन अशी संस्कृत मध्ये शपथ घेतली. त्यामुळे शिराळा तालुक्यातील जनतेच्या अशा अधिकच उत्तेजित झाल्या होत्या. शपथविधीला जाताना स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन व विधानसभेतील प्रथम पायरीचे दर्शन घेऊन सत्यजित देशमुख यांनी विधान भवनात प्रवेश केला. शिराळा तालुक्यातील जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी तालुक्यातील जनतेला दिला. सांगलीचे भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही यावेळी संस्कृतमध्येच आमदारकीची शपथ घेतली. यावेळी सत्ताधारी पक्षातील आमदार विविध रंगांच्या फेट्यांमध्ये विधिमंडळ परिसरात आल्याचे पाहायला मिळाले. भाजप आणि शिवसेने (शिंदे गट) चे आमदार भगव्या रंगाच्या फेट्यांमध्ये, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार गुलाबी रंगाच्या फेट्यांमध्ये दिसले.
Comments
Post a Comment