*पै. अशोक सावंत-पाटील यांना दत्त उद्योग समूहातर्फे तुरुकवाडी येथे कुस्ती प्रेमी पुरस्कार तर जंगली महाराज कुस्ती संकुल कोकणठाण भरत नाईकल यांना उत्कृष्ट वस्ताद पुरस्कार त्याचबरोबर आदर्श पत्रकारिता प्रताप शिंदे यांना पुरस्कार देण्यात आला*.
*पै. अशोक सावंत-पाटील यांना दत्त उद्योग समूहातर्फे तुरुकवाडी येथे कुस्ती प्रेमी पुरस्कार तर जंगली महाराज कुस्ती संकुल कोकणठाण भरत नाईकल यांना उत्कृष्ट वस्ताद पुरस्कार त्याचबरोबर आदर्श पत्रकारिता प्रताप शिंदे यांना पुरस्कार देण्यात आला*.......
----------------
शाहूवाडी तालुक्यातील तुरुकवाडी येथील दत्तसेवा उद्योग समूहाच्या माध्यमातून दरवर्षी दत्त जयंतीला खूप मोठे कुस्ती मैदान घेतले जाते आणि प्रत्येक वर्षी शिराळा आणि शाहूवाडी तालुक्यातील कुस्ती क्षेत्रात भरीव काम केलेल्या एका व्यक्तीला पुरस्कार दिला जातो. *यावर्षीचा पुरस्कार शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली गावचे सुपुत्र पै अशोक सावंत यांना देण्यात आला*. तर शिराळा तालुक्यातील पेठ या गावचे आत्मा मलिक संस्थेचे संचालक तसेच सुप्रसिद्ध वस्ताद भरत नाईकल यांना आदर्श वस्ताद म्हणून पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर आदर्श पत्रकार म्हणून प्रताप शिंदे यांनाही पुरस्कार देण्यात आला.
शाहूवाडी तालुक्यातील सामान्य गावचे, कुस्ती सारख्या खेळात वाहून घेणारे सोंडोली गावचे सुप्रसिद्ध पैलवान ज्यांनी संपूर्ण शाहूवाडी तालुक्यातील कुस्ती आपल्या लेखणीच्या माध्यमातून तसेच व्हिडिओच्या माध्यमातून जिवंत ठेवली वाढवली आणि तिचा प्रसार केला, असे याच मातीतील एक प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणजे अशोक सावंत.... यांना दत्त सेवा परिवार तर्फे कुस्ती प्रेमी तथा कुस्ती भूषण पुरस्कार मिळाला . अशोक सावंत हे कुस्तीसाठी अहोरात्र मेहनत घेतात, कुस्ती मैदान असेल तर ते मुंबईहून गावी येतात. मैदानात कुस्तीचे व्हिडिओ काढून प्रत्येक मैदानाविषयी आणि त्या गावाविषयी समाजापर्यंत माहिती पोहोचवून कुस्ती जिवंत ठेवण्याचे काम ही व्यक्ती करीत असते. 'कुस्ती हेच जीवन' च्या माध्यमातून अशोक सावंत यांनी महाराष्ट्रातील अनेक मैदाने आपल्या लेखणीच्या जोरावर समाजापर्यंत पोहोचवली कुस्ती हेच जीवनचे शाहूवाडी तालुका अध्यक्ष म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.
शाहूवाडी तालुक्यात खऱ्या अर्थाने कुस्तीचा प्रसार आणि प्रचार हा अशोक सावंत यांच्या माध्यमातून घराघरात पोहोचला. माथाडी कामगार म्हणून अहोरात्र काम करून, कुस्तीसाठी रात्र रात्रभर आपली लेखणी लिहून, खऱ्या अर्थाने कुस्ती जिवंत ठेवण्याचं काम अशोक सावंत यांनी केले. अशोक सावंत यांचे लेखणीतून सर्वसामान्यांच्या व्यथा अनेक पैलवानांच्या कथा त्या समाजा पर्यंत पोहोचू शकल्या किंबहुना कुस्तीला गती मिळू लागली याची दखल घेऊन दत्त सेवा उद्योग समूहाने यावर्षीचा पुरस्कार हा अशोक सावंत यांना दीला आहे. *मातीशी नातं जोडणारा, आणि प्रामाणिक कुस्तीची सेवा करणारा सोंडोली गावचा अशोक सावंत यंदाचा दत्त सेवा उद्योग समूहाच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. खर्या अर्थाने दत्त उद्योग समूहाने पुरस्कारासाठी कुस्तीतला अस्सल हिरा शोधून खरोखरच एक उचित काम केले आहे.
प्रत्येक वर्षी कुस्ती क्षेत्रात काम करणारे शाहूवाडी आणि शिराळा प्रत्येकी एक एक असा पुरस्कार यावर्षी आदर्श पत्रकार सुद्धा पुरस्कार देण्यात आला. आत्मा मलिक चे संचालक भरत नायकल यांनी कोकण ठाण यासारख्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ असणारा कुस्ती आखाडा स्थापन केला व त्यामध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मल्ल घडविले. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील हा पहिला आखाडा असेल जिथे शाकाहारी पैलवान तयार होतो आणि कुस्ती बरोबरच संस्काराचेही धडे शिकतो म्हणूनच त्यांना आदर्श वस्ताद पुरस्कार दिल्याने सर्वत्र या पुरस्काराचे कौतुक होत आहे. त्याचबरोबर सामाजिक आर्थिक क्रीडा आणि इतर सर्व क्षेत्रात आपल्या लेखणीने अनेकांचे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल व पत्रकारिता क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे प्रताप शिंदे यांनाही आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला. दत्त सेवा परिवार हा नेहमीच समाजाचे भान ठेवून आणि समाजप्रती आपले कार्य नेहमीच प्रामाणिकपणे करत असतात म्हणूनच दत्त उद्योग समूहाचे नेहमीच शिराळा आणि शाहूवाडी तालुक्यात विशेष कौतुक केले जाते.
---------------
संकलन
पै मनोज मस्के पत्रकार
Comments
Post a Comment