आणि देशमुख साहेबांचे स्वप्न पूर्ण झाले .

आणि देशमुख साहेबांचे स्वप्न पूर्ण झाले  .....
 मनोजकुमार मस्के - मांगरूळ
9890291065

      डोंगरी भागाचे भाग्यविधाते, राज्याचे सृजनशील व्यक्तिमत्व, लोकांशी जिव्हाळ्याचे नाते असलेले नेते म्हणजे शिवाजीराव देशमुख साहेब होय. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे  त्यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख (भाऊ ) आता आमदार झाले म्हणजे देशमुख साहेबच  उतरले असे म्हणता येईल.
      स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेबांनी वारणा खोऱ्याबरोबर राज्याची प्रगती केली. जनता आणि कार्यकर्ते यांच्याशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते काही कालानंतर उपयोगी पडले असे म्हणता येईल. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव उच्चशिक्षित सत्यजित देशमुख ( भाऊ ) यांनी गेली अनेक वर्ष राजकीय जीवनाचा खडतर प्रवास करत 2024 चे आमदारकीचे मैदान मारले. हे यश अगदी एक दोन वर्षात मिळालेले नाही तर सतत गेली काही वर्ष त्यांनी लोकांशी साधलेला संपर्क,  साहेबांच्या कार्यकर्त्यांची बांधलेली मोट,  शिराळा - वाळवा तालुक्यातील लोकांचे प्रश्न - समस्या जाणून घेत होते.   जेवढे प्रश्न सोडवता येतील तेवढे ते सोडवीत होते. विकासासाठी प्रयत्नशील होते.  सत्ता नसतानाही विकासाची कामे करीत होते. लोकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करीत होते. या सर्वांमुळे ते 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत ते आमदार झाले म्हणजेच एक प्रकारे देशमुख साहेबच अवतरले असेच म्हणता येईल . 
      शिराळा विधानसभा मतदारसंघातील नव्याने झालेले आमदार सत्यजित शिवाजीराव देशमुख यांना तब्बल 34 वर्षानंतर आमदारकी भेटली . त्यामुळे शिराळात आणि वाळवा तालुक्यातील लोकांच्या मध्ये आनंद आणि उत्साह दिसून येत आहे . स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांनी सलग तीन वेळा आमदारकी व अनेक मंत्रिपदे भूषवली होती.  सन 1990 ही साहेबांनी शेवटची निवडणूक लढविली. 1995 ला ते आमदारकी पासून बाजूला झाले.  आपल्या तालुक्यातील कोणाला तरी आमदार करायचं या हेतूने शिवाजीराव देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतली . शंकरराव चरापले यांना तिकीट देण्याचे जाहीर केले. परंतु त्याचवेळी शिवाजीराव नाईक यांनी तिकिटाची मागणी करून देखील तिकीट न दिल्यामुळे बंडखोरी केली.  आणि शिवाजीराव नाईक यांनी 1995 ची विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर तब्बल 29 वर्ष देशमुख घराणे आमदारकी पासून वंचित राहिले. खरंतर राजकारणाशी एक जिव्हाळ्याचं नातं असणारे हे  घराणं आमदारकी पासून बरीच वर्षे वंचित राहीले.  ही बाब जरी खरी असली तरी या घराण्याने राजकारणातून काढता पाय कधीच घेतला नाही. अनेक वेळा अपमान सहन करत त्यांनी राजकारणाची कोणतीही सत्ता नसताना 34 वर्षे लोकांची कामे करीत पार केली. आणि अखेर जनतेने  आणि कार्यकर्त्यांनी  या घराकडे आपला कल दर्शविलाश
. त्यातच सम्राट बाबा यांची मिळालेली खरी साथ यामुळे 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्यजित भाऊ आमदार झाले .  
       खरंतर शिराळा तालुक्यात कोणत्या पक्षाचा किंवा कुठल्या नेत्याचा प्रभाव न होता सर्वसामान्य जनतेतून एक लाट होती. अनेक वेळा एकच आमदार या गोष्टीचा थोडाफार फरक आणि काहीतरी नवीन या अनुषंगाने यावेळी संपूर्ण शिराळा तालुक्यातील जनतेने सत्यजित देशमुख यांना कौल दिला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  तसं पाहता शिराळा तालुक्यातील जनतेने कोणत्या पक्षाला मतदान दिले नसून ते एका व्यक्तीला मतदान झाल्याची चर्चा सर्वत्र बोलली जात आहे. शिराळा तालुक्यातील जनता पूर्वीपासूनच कोणत्या पक्षाची नसून ती व्यक्तीच्या, एखाद्या गटाशी जोडलेली आहे. खेडोपाडी काम करणारा इथला माणूस कोणत्या ना कोणत्या गटाशी जोडलेला असतो. त्यामुळे किती वेळा पक्ष बदलले आणि किती वेळा चिन्ह बदलली तरी इथली जनता गटातच काम करत असते. जनतेला मानणारा  माणूस असला की जनता माणसाला मानते हे पुन्हा एकदा या निवडणुकीने दाखवून दिलं. 
स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांनी राजकारण केलं खरं परंतु राजकारणातून समाजाची सेवा केली . त्यामुळे की काय कदाचित त्यांची कॉलेज, हॉस्पिटल किंवा खूप मोठी प्रॉपर्टी असं काही दाखवण्यासारखं राहिलं नाही. दाखवण्यासारखी राहिली ती फक्त त्यांची माणुसकी..  याच माणुसकीच्या जीवावर शिराळा तालुक्यातील जनता त्यांना देवमाणूस मानू लागली. सत्यजित देशमुख आमदार झाल्यानंतर देशमुख वाड्यावर पुन्हा तोच गलगला पाहायला मिळत होता. असंख्य गाड्या वाड्याच्या बाहेर लागल्या होत्या. हे सर्व दृश्य पाहिल्यानंतर ज्येष्ठ  लोक रडून सत्यजित देशमुख यांना सांगत होती, आज परत साहेबांची आठवण आली.. अनेक जण सत्यजित यांना जवळ घेऊन सांगत होते.. पोरा बापानं नाव केलं.. तसं नाव कर.  काय करायची आपणाला धन दौलत.. आज तुझ्या बापाचा फोटो प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरात देवाऱ्याची जागा घेतोय.. अरं यापेक्षा मोठी दौलत आणि कुठल्या नेत्यानं कमीवलीया  का! तुझ्या बापाचं स्वप्न आम्ही पूर्ण केलंय... आता बाप्पागत आमच्या मनावर राज्य कर आणि साहिबागत तु बी नाव मोठं कर! अनेक जण डोळ्यात पाणी आणून सांगत होता. क्षणोक्षणाला शिवाजीराव देशमुख यांची आठवण होत होती. अनेक कार्यकर्त्यांनी जीव तोडून या निवडणुकीत आपला सहभाग नोंदवला होता.
         खरं पाहता एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो.  त्याचप्रमाणे सत्यजित देशमुख यांच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्या धर्मपत्नी रेणुका वहिनींनी व त्यांच्या लाडक्या कन्येने हातात घेतली होती. सोशल मीडियाच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ठेवून प्रत्येक मोमेंट अगदी व्यवस्थित त्या पार पाडत होत्या. वाडी, वस्ती, गावात अनेक दिवस महिलांसाठी त्या काम करीत होत्या . प्रत्येक घराघरात स्वतः रेणुका ताई जाऊन आल्याने प्रत्येकाला त्या जवळच्या वाटल्या. नावाप्रमाणे कडक वाटणाऱ्या रेणुकाताई खरंच किती मायाळू आहेत हे निवडणुकीच्या काळात प्रत्येक महिलेने अनुभवील्या. प्रत्येक घरात जणू त्या काही आपण यांना कधीतरी भेटलोय, या हेतूने किंवा आपलं काहीतरी यांच्याशी नातं आहे, या अनुषंगाने त्या प्रत्येक मतदाराला भेटत होत्या. खरंतर याच गोष्टीचं मोठं कौतुक या मतदार माता भगिनींना वाटल्यानेच हा बऱ्याच अंशी बदल घडलेला आहे हे खोटं ठरवता येत नाही. 
      तब्बल 34 वर्षानंतर देशमुख वाड्यावर आमदारकीचा बोर्ड लागला होता. एवढेच काय गुलालाचे थर साचले होते, फटाक्यांच्या अतिश बाजी होत होती.  संपूर्ण घर विद्युत रोषणाईने सजवलं होतं. कारण खऱ्या अर्थाने आज शिवाजीराव देशमुख यांचे स्वप्न पूर्ण झालं होतं. त्यांचा मुलगा सत्यजित हा आमदार म्हणून या वाड्यावर आला होता. एवढेच काय आज त्याच बापाच्या राजकीय खुर्चीवर बसून जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झटणार आणि साहेबांच्या वाक्याप्रमाणे शंभर कामे झाली नाही तरी चालतील, परंतु एक चुकीचं काम करणार नाही असा जणू त्यांनी विश्वास दिला. यापुढे देशमुख साहेबांप्रमाणे काम करेन व आमदारकीचे हॅट्रिक पार करेन एवढा मोठा विश्वास त्यांनी जनतेला दिला..

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*