Posts

Showing posts from December, 2024

*पै. अशोक सावंत-पाटील यांना दत्त उद्योग समूहातर्फे तुरुकवाडी येथे कुस्ती प्रेमी पुरस्कार तर जंगली महाराज कुस्ती संकुल कोकणठाण भरत नाईकल यांना उत्कृष्ट वस्ताद पुरस्कार त्याचबरोबर आदर्श पत्रकारिता प्रताप शिंदे यांना पुरस्कार देण्यात आला*.

Image
*पै. अशोक सावंत-पाटील यांना दत्त उद्योग समूहातर्फे तुरुकवाडी येथे कुस्ती प्रेमी  पुरस्कार तर जंगली महाराज कुस्ती संकुल कोकणठाण भरत नाईकल यांना उत्कृष्ट वस्ताद पुरस्कार त्याचबरोबर आदर्श पत्रकारिता प्रताप शिंदे यांना पुरस्कार देण्यात आला*.......  ---------------- शाहूवाडी तालुक्यातील तुरुकवाडी येथील दत्तसेवा उद्योग समूहाच्या माध्यमातून दरवर्षी दत्त जयंतीला खूप मोठे कुस्ती मैदान घेतले जाते आणि प्रत्येक वर्षी शिराळा आणि शाहूवाडी तालुक्यातील कुस्ती क्षेत्रात भरीव काम केलेल्या एका व्यक्तीला पुरस्कार दिला जातो. *यावर्षीचा पुरस्कार शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली गावचे सुपुत्र पै अशोक सावंत यांना देण्यात आला*. तर शिराळा तालुक्यातील पेठ या गावचे आत्मा मलिक संस्थेचे संचालक तसेच सुप्रसिद्ध वस्ताद भरत नाईकल यांना आदर्श वस्ताद म्हणून पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर आदर्श पत्रकार म्हणून प्रताप शिंदे यांनाही पुरस्कार देण्यात आला. शाहूवाडी तालुक्यातील सामान्य गावचे, कुस्ती सारख्या खेळात वाहून घेणारे सोंडोली गावचे सुप्रसिद्ध पैलवान  ज्यांनी संपूर्ण शाहूवाडी तालुक्यातील कुस्ती आप...

आमदार सत्यजित देशमुख यांनी जगातील पहिल्या भाषेचा मान राखत.. आमदार झाल्यानंतर पहिली शपथ संस्कृत मधून घेतली...

Image
आमदार सत्यजित देशमुख यांनी जगातील पहिल्या भाषेचा मान राखत.. आमदार झाल्यानंतर पहिली शपथ संस्कृत मधून घेतली... मनोजकुमार मस्के, मांगरूळ  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे भाजपाचे नेते आणि शिराळा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित देशमुख यांनी संस्कृतमध्ये आमदारकीची शपथ घेतल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान सत्यजित देशमुख यांच्या शपथविधीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. संस्कृत ही जगात पहिली बोलली जाणारी भाषा म्हणून ओळखली जाते. भारत हा पूर्वी भक्तीप्रधान देश होता म्हणूनच येथे प्रत्येक युगात देव, देवी आणि भगवान सर्वशक्तिमान मानले जातात. जगातील कोणत्याही देशाला असा इतिहास नाही. म्हणूनच, भारताला महान भूमी, योगभूमी, म्हटले जाते. संस्कृत ही देव, देवी आणि भगवान यांचीही भाषा मानली जाते. खऱ्या अर्थाने सत्यजित देशमुख यांनी जगातील पहिल्या भाषेचा मान ठेवत, देवाधिकांच्या काळातील भाषेत  शपथ घेत, आपणाला  निवडून दिलेल्या जनतेशी प्रामाणिक राहून सेवा करेन अशी संस्कृत मध्ये शपथ घेतली. त्यामुळे शिराळा तालुक्यातील जनतेच्या अशा अधिकच उत्तेजित झाल्या होत्या...

आणि देशमुख साहेबांचे स्वप्न पूर्ण झाले .

Image
आणि देशमुख साहेबांचे स्वप्न पूर्ण झाले  .....  मनोजकुमार मस्के - मांगरूळ 9890291065       डोंगरी भागाचे भाग्यविधाते, राज्याचे सृजनशील व्यक्तिमत्व, लोकांशी जिव्हाळ्याचे नाते असलेले नेते म्हणजे शिवाजीराव देशमुख साहेब होय. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे  त्यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख (भाऊ ) आता आमदार झाले म्हणजे देशमुख साहेबच  उतरले असे म्हणता येईल.       स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेबांनी वारणा खोऱ्याबरोबर राज्याची प्रगती केली. जनता आणि कार्यकर्ते यांच्याशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते काही कालानंतर उपयोगी पडले असे म्हणता येईल. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव उच्चशिक्षित सत्यजित देशमुख ( भाऊ ) यांनी गेली अनेक वर्ष राजकीय जीवनाचा खडतर प्रवास करत 2024 चे आमदारकीचे मैदान मारले. हे यश अगदी एक दोन वर्षात मिळालेले नाही तर सतत गेली काही वर्ष त्यांनी लोकांशी साधलेला संपर्क,  साहेबांच्या कार्यकर्त्यांची बांधलेली मोट,  शिराळा - वाळवा तालुक्यातील लोकांचे प्रश्न - समस्या जाणून घेत होते.   जेवढे प्रश्न सोडवता येतील तेवढ...