गावात भगवान मस्के बापू यांचे कौतुक केले जात आहे.
मांगरूळ गावच्या विकासामध्ये बऱ्यापैकी आणि उत्कृष्ट काम जर कोणी केले असेल तर सध्याचे ग्रामपंचायत सदस्य भगवान मस्के यांनी केले असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही. गेले अनेक दिवस झाले मांगरूळ गावच्या विकासासाठी सदस्य नसताना ज्यांनी मोरेवाडी साठी लाखो रुपयांचा निधी आणून अतिशय उत्कृष्ट असा मोरेवाडीचा विकास करून घेतला. प्रत्येक घराच्या दारात रस्ता, नाले पाणी या सुविधा माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासोबत राहून आपल्या लोकवस्तीसाठी खेचून आणल्या. त्याचबरोबर पहिल्यांदाच मांगरूळ ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर अनेक कामांना ज्या माणसाने गती आणली आणि आपल्या कामातून अनेकांची मने जिंकली. खऱ्या अर्थाने माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचे जिवाभावाचे कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आज संपूर्ण शिराळा तालुक्यात आहे. आज चिंचेश्वर मंदिराकडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरती संरक्षण भिंतीची गरज अनेक वर्ष झालं होती. हिच अडचण ओळखून भगवान बापू यांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्याकडे शब्द टाकला आणि लगेचच नाईक साहेबांनी खासदार धैर्यशील माने यांना फोन लावून निधी देण्यास विनंती केली. त्या अनुषंगाने शिवाजीराव नाईक यांच्या शब्दाला मान देऊन धैर्यशील माने यांनी जवळपास १५ लाखाचा निधी मांगरूळला दिला. यामध्ये विठ्ठल मंदिर ते नायकवडी यांच्या घरापर्यंत काँक्रीटीकरण, तसेच सत्यवान खांडेकर यांच्या घरापासून ते मानसिंग पाटील यांच्या घरापर्यंत काँक्रीटीकरण व चिंचेश्वर मंदिराकडे जाणारा संपूर्ण संरक्षण भिंत व मंदिर परिसरात काँक्रिटीकरण याच फंडातून पूर्ण करण्यात आले. मांगरूळ गावचे युवा नेते संग्रामसिंह पाटील यांचे सहकार्याने तसेच माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या आशीर्वादाने व खासदार धैर्यशील माने व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या विश्वासाने आपण गावात अनेक प्रकारचा निधी आणू शकलो व गावच्या विकासाला गती देऊ शकलो असं मन मोकळेपणाने सध्याचे ग्रामपंचायत सदस्य भगवान मस्के बापू यांनी सांगितले.
आज मांगरूळ गावचे ग्रामदैवत चिंचेश्वर मंदिर या मंदिराच्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण केल्याने संपूर्ण गावात भगवान मस्के बापू यांचे कौतुक केले जात आहे.
Comments
Post a Comment