Posts

Showing posts from March, 2024

कृष्णा पंजाबचा नातू एमबीबीएस डॉक्टर झाला*..

Image
*कृष्णा पंजाबचा नातू एमबीबीएस डॉक्टर झाला*.... अनेकजण परिस्थितीचे भांडवल करतात. पुढे जायचे होते. परंतु पैसा नव्हता, परिस्थिती नव्हती. अशी कारणे अनेकजण सांगतात. परंतु पुढे जाण्यासाठी, यश मिळविण्यासाठी, स्वप्न साकार करण्यासाठी परिस्थिती, गरिबी, पैसा कधीही आड येत नाही. परिस्थिती कशीही असो, ती बदलता येते, परिश्रम आणि गुणवत्तेने....हेच एका छोट्याशा गावातील ग्रामसेवकाच्या मुलाने दाखवून दिले आहे. अथक परिश्रमाने त्याने एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान मिळविला आहे. ही यशोगाथा आहे, शिराळा तालुक्यातील मांगरूळ गावच्या सुशांत संजय मस्के याची. वडील संजय मस्के हे कोल्हापूर जिल्हयात ग्रामसेवक म्हणून नोकरीला आहेत . वडीलांना भाऊ नसल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच. त्यांना दोन मुले. आई सुनंदा ही गृहिणी. घरची जमीन तुटपुंजी त्यातच मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह. त्यात शेतीत होणारी नापिकी, नैसर्गिक आपत्ती अशी परिस्थिती असतानाही, संजय मस्के यांनी, मुलांना शिक्षण दिले. परिस्थितीशी दोन हात करीत, त्यांनी सुशांतला डॉक्टर करण्यासाठी परिश्रम घेतले. सुशांतनेसुद्धा त्यांचे परिश्रम, जिद्द ...

गावात भगवान मस्के बापू यांचे कौतुक केले जात आहे.

Image
मांगरूळ गावच्या विकासामध्ये बऱ्यापैकी आणि उत्कृष्ट  काम जर कोणी केले असेल तर सध्याचे ग्रामपंचायत सदस्य भगवान मस्के यांनी केले असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही. गेले अनेक दिवस झाले मांगरूळ गावच्या विकासासाठी सदस्य नसताना ज्यांनी मोरेवाडी साठी लाखो रुपयांचा निधी आणून अतिशय उत्कृष्ट असा मोरेवाडीचा विकास करून घेतला. प्रत्येक घराच्या दारात रस्ता, नाले पाणी या सुविधा माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासोबत राहून आपल्या लोकवस्तीसाठी खेचून आणल्या. त्याचबरोबर पहिल्यांदाच मांगरूळ ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर अनेक कामांना ज्या माणसाने गती आणली आणि आपल्या कामातून अनेकांची मने जिंकली.  खऱ्या अर्थाने माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचे जिवाभावाचे कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आज संपूर्ण शिराळा तालुक्यात आहे. आज चिंचेश्वर मंदिराकडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरती संरक्षण भिंतीची गरज अनेक वर्ष झालं होती. हिच अडचण ओळखून भगवान बापू यांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्याकडे शब्द टाकला आणि लगेचच नाईक साहेबांनी खासदार धैर्यशील माने यांना फोन लावून निधी देण्यास...

मंगरूळ यात्रेनिमित्त खास

Image
नमस्कार मित्रांनो थोड्याच दिवसात आपल्या गावची यात्रा येणार आहे. खरंतर यात्रा म्हटलं की आनंद आणि जवळपास पोटापाण्यासाठी बाहेर गेलेल्या सर्वच गावकऱ्यांचे त्यानिमित्ताने आपल्या गावाकडे येणं होतं. गावात सगळेच बाहेरगावी गेलेले मुळ गावात आल्याने एक आनंद निर्माण होतो. खरंतर यात्रा यासाठीच केल्या जातात. पै, पाहुणे, मित्रमंडळी आजूबाजूच्या गावातील आपल्या ग्रामदैवतावर प्रेम करणारे अनेक भक्तगण असे सर्वच या दिवशी आपल्या गावात खरोखर एक आनंदाचं वातावरण असतं. मला आपणाला सांगायचे एवढेच आहे आज यात्रेच्या नावाखाली आपण वर्गणी जमा करतो. खरंतर गोळा केलेली वर्गणी आपण कोणतेही चांगल्या कामासाठी वापरतो का? याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. बाहेरील पैलवान आणून आपल्या गावात लढवायचे आणि लाखो रुपये त्यांच्यावरती उधळायचे ही गोष्ट तात्पुरता आनंद देणारी असेल कदाचित परंतु आपल्याच गावातील शाळेतील मुलांना आपण बऱ्यापैकी सोयीसुविधा पुरवतोय का? हेही पाहणं गरजेचं आहे की नाही. मला वाटतं कदाचित आपण गोळा केलेली रक्कम मंदिर परिसरातील सुशोभीकरणासाठी आपण वापरतोय का? किंवा बाहेरून येणाऱ्या भक्तगणांना आपण त्या स्वरू...