कृष्णा पंजाबचा नातू एमबीबीएस डॉक्टर झाला*..
*कृष्णा पंजाबचा नातू एमबीबीएस डॉक्टर झाला*....
अनेकजण परिस्थितीचे भांडवल करतात. पुढे जायचे होते. परंतु पैसा नव्हता, परिस्थिती नव्हती. अशी कारणे अनेकजण सांगतात. परंतु पुढे जाण्यासाठी, यश मिळविण्यासाठी, स्वप्न साकार करण्यासाठी परिस्थिती, गरिबी, पैसा कधीही आड येत नाही. परिस्थिती कशीही असो, ती बदलता येते, परिश्रम आणि गुणवत्तेने....हेच एका छोट्याशा गावातील ग्रामसेवकाच्या मुलाने दाखवून दिले आहे. अथक परिश्रमाने त्याने एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान मिळविला आहे.
ही यशोगाथा आहे, शिराळा तालुक्यातील मांगरूळ गावच्या सुशांत संजय मस्के याची. वडील संजय मस्के हे कोल्हापूर जिल्हयात ग्रामसेवक म्हणून नोकरीला आहेत . वडीलांना भाऊ नसल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच. त्यांना दोन मुले. आई सुनंदा ही गृहिणी. घरची जमीन तुटपुंजी त्यातच मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह. त्यात शेतीत होणारी नापिकी, नैसर्गिक आपत्ती अशी परिस्थिती असतानाही, संजय मस्के यांनी, मुलांना शिक्षण दिले. परिस्थितीशी दोन हात करीत, त्यांनी सुशांतला डॉक्टर करण्यासाठी परिश्रम घेतले. सुशांतनेसुद्धा त्यांचे परिश्रम, जिद्द सार्थकी ठरविले. मुलगा डॉक्टर झाल्याने, आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. सुशांत एमबीबीएस डॉक्टर झाला. सुशांतचे ४थी पर्यंतचे शिक्षण कोल्हापूर येथील न्यु प्राथमिक शाळेत,५वीला सरस्वती विद्यालय शेडगेवाडी त्यानंतर ६वी ते १०वी नवोदय CBC मधुन तर महाविद्यालयीन शिक्षण कराड येथील लिंगाडी पाटील कॉलेज व पदवीपर्यंतचे वैद्यकीय शिक्षण राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय ठाणे येथे झाले. सुशांतने जिद्द व कठोर परिश्रमाने एमबीबीएसची पदवी घेऊन परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याने इंग्रजी विषय घेऊन पदवी संपादन केली.
*मांगरूळ गावातील पहिले एमबीबीएस डॉक्टर आत्माराम शेणवी- पाटील हे असावेत .खरंतर एमबीबीएस डॉक्टर होणे ही फार मोठी गोष्ट आहे. आज एमबीबीएस डॉक्टर क्लासवन पोस्ट आहे. वर्ग -१ चे हे पद असल्याने खरोखरच मांगरूळ सारख्या सामान्य गावातून एमबीबीएस सारखी पदवी घेणे ही गावासाठी गर्वाची गोष्ट आहे. आज डॉक्टर झाल्याबद्दल सुशांत मस्के याचे अभिनंदन करताना गावातील पहिले एमबीबीएस डॉक्टर आत्माराम शेणवी पाटील. आज पुन्हा एकदा सुशांतने मांगरूळचे नाव उज्वल केले*...
Comments
Post a Comment