प्रिय मनोज दादा ,
प्रिय मनोज दादा ,
आम्हाला आनंद देणाऱ्या बालपणातील आमच्या सर्व चांगल्या-वाईट आठवणी ज्याच्याशी जुडलेल्या आहेत अशा आमच्या प्रेमळ, हुशार, समजूतदार आमच्या आयुष्यातील चढ-उतारामध्ये आम्हाला खंबीरपणे पाठिंबा देऊन मार्गदर्शकाची उत्तम भूमिका निभावणाऱ्या आयुष्यातील वळणाचा प्रवास ज्याच्या सहवासामुळे आम्हाला सहज पार करता आला, लहानपणीची आपली भांडणं, मोठेपणी तु आम्हाला दिलेला आधार आणि आजही मिळणारे तुझे अमूल्य मार्गदर्शन हा आमच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा ठेवा आहे, भावापेक्षा जास्त जो आमचा मित्र आहे, त्याच्याशी आम्ही आमच्या मनातील सर्व गोष्टी शेअर करू शकतो जो आम्हाला नेहमीच आधार देतो आणि मार्गदर्शन करतो, ज्याच्याशी बोलल्यानंतर आम्हाला आमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर मिळते आणि समस्या सोडवण्यासाठी जो आमची मदतही करतो, आमच्यासाठी आमचे आई-वडिलांची अशी दुहेरी भूमिका हे ठामपणे निभावणाऱ्या, आम्हाला आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्याची सोबत हवी आणि ज्याच्या चेहऱ्यावर आम्हाला सर्वकाळ आनंद पाहायचा आहे असा तू.
आज तुझा जन्मदिवस म्हणजे आजच्या दिवशी आपल्या आई ने पहिला कर्तव्यदक्ष पुत्र तुझ्या रूपाने जन्माला घातलाआज जवळपास चाळीशी ओलांडली खरंतर लहानपणापासून खोडकर, सर्वांशी मनमिळावू आणि प्रेमळ आणि तितकाच रागीट स्वभावाचा तू 2009 साली वडिलांचं छप्पर जेव्हा आपल्या डोक्यावरून उडून गेले तेव्हा आम्हाला तर सर्व संपल्या सारखं वाटलं आमचा आधार संपल्यासारखं झालं आम्ही सगळं असून सगळं गमावल्यासारखं झालं खूप वाईट परिस्तिथीत होतो खचून गेलो होतो आणि मग तिथून पुढे तुझी जबाबदारी सुरू झाली असल्या परिस्तितीत तू आम्हा लहान भावंडाना सावरण्याची ताकद दिलीस आईला सावरण्यासाठी स्वतः मुंबई सोडून आई सोबत राहण्याचा निर्णय घेतलास आणि आम्हाला पुढे चालण्यास सांगितलंस तेव्हा काहीच समजत नव्हतं पुढे काय होणार कारण या दुःखातून सावरण्यासाठी खूप वेळ लागणार होता पण तू स्वतः सावरत सावरत आम्हाला धीर दिलास आणी खूप मोठा डोंगर आपल्याला चढायचा आहे यासाठी नेहमी प्रोत्साहित करत आलास हळू हळू आम्ही सावरलो पण यामध्ये बापाची जागा तू खूप चांगली निभावत आलास आणि अशीच शेवटपर्यंत निभावशील हा विश्वास आहे अण्णा गेल्यानंतर तू आम्हाला प्रत्येक वळणावर योग्य मार्ग दाखवत आलास खूप काही संकटावर मात करण्याची ताकद तू आमच्यात निर्माण केलीस हीच ताकद भविष्यात अजून मोठी होईल असा आम्ही नेहमी प्रयत्न करीन
आई आणि अण्णा यांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहेच आणि आपण सदैव आपल्या आईवडिलांच्या चारानस्पर्शाने पुढचं कर्तव्य सुद्धा जोमाने करू तू आमची ताकत आहेस याच ताकदीचा उपयोग समाजकार्य आणि गोरगरिबांना मदत यामध्ये आनंदाने घालवू
आज तुझ्या जन्मदिवशी तुला खूप साऱ्या शुभेच्छा अवक्षवंत हो दीर्घायु हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
तुझे लहान भाऊ...
Comments
Post a Comment