*महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष सम्राट महाडिक यांनी कुस्ती निवेदक सुरेश जाधव यांना कायमस्वरूपी दूध संघातून मानधन चालू केले*
*महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष सम्राट महाडिक यांनी कुस्ती निवेदक सुरेश जाधव यांना कायमस्वरूपी दूध संघातून मानधन चालू केले*
कुस्ती हा खेळ पूर्वीपासून चालत आलेला खेळ आहे. देवाधिकांच्या काळापासून ते राजे महाराजे यांच्याही काळात कुस्तीचे अनेक दाखले आढळतात. पूर्वी कुस्ती शौकीन तिकीट काढून कुस्ती मैदान पाहायला जात होते. पूर्वीच्या काळी अनेक पैलवानांना राजाश्रय होता. अलीकडील काळात मात्र लोकवर्गणीतून पैलवान सांभाळला जात आहे. स्वर्गीय वसंत दादा यांनी शासकीय परिपत्रक काढून कारखाना, दूध संस्था या संस्थेतून मानधनदारी पैलवान सांभाळावे असा आदेश काढला होता. अलीकडील काळात मात्र अनेक दूध संस्थांनी, कारखानदारांनी, कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं जाणीवपूर्वक पाहायला मिळत असताना महाडिक कुटुंबीयांनी मात्र ही परंपरा कायम जपली असल्याचे परवा चिंचोली येथे झालेल्या कुस्ती मैदानात पाहायला मिळाले. नुकताच नव्याने स्थापन झालेला वनश्री दूध संघ या संघाच्या माध्यमातून अनेक कुस्ती मैदानावर आपल्या वाणीने कुस्ती शौकिनांची मने जिंकलेले सुप्रसिद्ध निवेदक सुरेश जाधव चिंचोलीकर यांना वनश्री दूध संघातून कायमस्वरूपी कुस्ती निवेदक म्हणून मानधन चालू करण्यात आले. या मानधनाची घोषणा महाडिक युवाशक्तीचे शिराळा तालुक्याची धुरा सांभाळणारे नेते केदार नलवडे यांनी चिंचोली येथे झालेल्या कुस्ती मैदानात जाहीर केले. स्व. नानासाहेब महाडिक यांनी कुस्ती क्षेत्र वाढीसाठी खूप मोलाचे काम केले होते. त्यांच्याच पावलावर पाऊले टाकीत महाडिक युवा शक्तीची धुरा सांभाळत सम्राट महाडिक व राहुल महाडिक यांनी कुस्ती व पैलवानांचा वारसा पुढे चालवला आहे. स्वर्गीय नानासाहेब महाडिक यांच्या निधनानंतर महाडिक युवाशक्ती अतिशय प्रभावीपणे हे दोन भाऊ सांभाळत आहेत. कुस्तीतील डावपेचा बरोबरच राजकीय डाव सुद्धा अतिशय चाणक्य पद्धतीने खेळणारे हे दोन बंधू शिराळा वाळवा तालुक्यातील अनेक गोरगरिबांना दुवा ठरताना दिसत आहे . माडी किंवा शक्तीचा तळागाळातील कार्यकर्ता हा मोठा व्हावा चार पैसे कमवावे उद्योग धंदा वाढवावा या पद्धतीचा विचार राहुल महाडिक सम्राट महाडिक यांचा नेहमीच असल्याने वाळवा तालुक्याबरोबरच शिराळा तालुक्यात सुद्धा याचा प्रभाव प्रामुख्याने दिसत आहे. राहुल महाडिक सम्राट महाडिक यांचे कार्य हे असंच जोमाने चालत राहो आणि अनेक तळागाळातील गरजू व्यक्तींना त्याचा लाभ व्हावा एवढी माफक अपेक्षा..
शरद पाटील - माजी सरपंच
Comments
Post a Comment