*मा. सम्राट महाडिक (बाबा )* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
*मा. सम्राट महाडिक (बाबा )* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
*सम्राट महाडिक बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅटवरील कुस्ती स्पर्धा दिनांक 15 डिसेंबर रोजी चिंचोली येथे होणार शिराळा, वाळवा, शाहुवाडी मर्यादित*
मा. सम्राट महाडीक आणी राहुल महाडीक ही एका रथाची दोन चाके आहेत. दोन्ही ही तितक्याच वेगाने धावतात जीतक्या वेगाने आगीनगाडी रुळावरून धावते. स्वर्गिय वनश्री नानासाहेब महाडीक (नाना ) यांचे हे पुत्र म्हणजे रामलक्ष्मणाची जोडी आहे.
महाडीक घराने नेहमीच पैलवानांना एक वरदान होते. त्याच बरोबर कुस्तीची परंपरा सुद्धा या कुटुंबाने अखंड जपली असुन वडीलांच्या पायावर पाय ठेऊन लाल मातीची सेवा बजावत असणारे राम- लक्ष्मणा प्रमाणे ही जोडी मा. राहुल महाडीक, मा. सम्राट महाडिक यांच्या रूपाने शिराळा व वाळवा तालुक्याला लाभली आहे.
सध्या तालुक्यातील युवकांचे आयडॉल ठरलेले व प्रत्येकाला आपले जवळचे वाटणारे सम्राट महाडिक खऱ्या अर्थाने युवकांचे नेते ठरले आहेत. शिराळा, वाळवा तालुक्यात हक्कानी हाक मारल्या नंतर हाकेला ओ देणारे व सर्वसामान्यांच्या मुलांच्या पाठीवर थाप मारणारा हा एकमेव अवलीया असेल ज्याचं नाव सम्राट महाडिक बाबा. आज त्यांचा वाढदिवस
या वाढदिवसानिमित्त शिराळा तालुक्यातील सम्राट बाबा यांचे जीवाभावाचे कार्यकर्ते व कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा प्रमुख चिंचोली गावचे माजी सरपंच पै. शरद पाटील तसेच चिंचोली गावचे माजी उपसरपंच मा. प्रकाश पाटील व इतर कार्यकर्ते यांच्या सहकार्याने चिंचोली येथे दिनांक 13 डिसेंबर रोजी भव्य दिव्य अशा कुस्ती स्पर्धा होणार आहेत. या कुस्ती स्पर्धेसाठी शिराळा वाळवा आणि शाहूवाडी येथून अनेक मल्ल या स्पर्धेसाठी हजर राहणार आहेत. त्याचबरोबर ओपन गटातील विजेत्या पैलवानाला मानाची वनश्री केसरी मानाची गदा देण्यात येणार आहे. शिराळा, वाळवा ,शाहूवाडी तालुक्यातील सामान्यातल्या सामान्य युवा हा बाबांचा कार्यकर्ता आहे . युवा कार्यकर्ता काय करू शकतो हे गेलेल्या विधानसभेत सम्राट बाबांनी दाखवून दिले आहे. पायाला भिंगरी बांधून अनेक सैनिकांनी कार्यकर्त्यांनी बाबांचं काम केलं आणि सम्राट बाबा हरले असले तरी मोठ्या मताधिक्क्याने त्यांना पुढे रेटण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं, इथेच त्यांचा खऱ्या अर्थाने विजय दिसून आला. आता तर जोडीला सत्यजित देशमुख भाऊंची ताकद असल्याने सम्राट महाडिक यांना हत्तीचे बळ मिळणार असं सर्वत्र बोललं जात आहे. कुठल्याही पुढाऱ्याला भीक न घालता सामान्यातला असामान्य कार्यकर्ता मोठा कसा होईल आणि युवा पिढीच्या हातात उद्याचं नेतृत्व कसं जाईल यादृष्टीने सम्राट बाबा नेहमीच विचार करत असतात. थोडं बारकाईने पाहिलं तर प्रत्येकाच्या लक्षात येईल बाबांनी कोणतेही मोठ्या पुढाऱ्याला विचारलेलं नसून प्रत्येक गावात एका गरीबाच्या मुलाला आपला सच्चा कार्यकर्ता बनवलेलं आहे. त्यामुळेच युवा पिढी ही सम्राट महाडिक या नावाला पुढे घेऊन जाताना शिराळा तालुक्यासह सर्वत्र दिसत आहे. आजचा हा युवक उद्याचा नेता म्हणून चमकु शकतो असं सम्राट महाडिक यांचं ठाम मत आहे. म्हणूनच कधी नव्हे ती शिराळा तालुक्यातून यावर्षी सम्राट महाडिक यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे . राजकारण हे तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते पोचवणारा युवा वर्गच असू शकतो हे मात्र बाबांना पक्क माहित आहे. म्हणूनच तर शिराळा तालुक्यात काही ठिकाणी रक्तदान शिबिरे, पशुप्रदर्शने, क्रीडा स्पर्धा अशा अनेक गोष्टी या युवा पिढीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. अशा या युवा नेतृत्वाला महाराष्ट्र राज्य कुस्ती हेच जीवन तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
*शुभेच्छुक*
*मनोजकुमार मस्के* (पत्रकार)
अध्यक्ष शिराळा तालुका कुस्ती हेच जीवन
9890291065
Comments
Post a Comment