आनंदराव गायकवाड (फुपिरे) यांची रेल्वे सेवेतून सेवानिवृत्ती*.....
*आनंदराव गायकवाड (फुपिरे) यांची रेल्वे सेवेतून सेवानिवृत्ती*.....
------------------------------
फुपिरे गावचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते *पैलवान आनंदराव गायकवाड यांची रेल्वे सेवेतून ३० डिसेंबर रोजी सेवानिवृत्ती झाली आहे*.
फुपिरे हे शिराळा तालुक्यातील गाव असून या गावात एक बिजली मल्ल म्हणून ज्यांची अजुनही ओळख आहे ते म्हणजे आनंदराव गायकवाड... लहानपणापासून कुस्तीची आवड, गावातच कुस्तीचा श्रीगणेशा केला आणि जेमतेम शिक्षण झाल्यावर मुंबईतील महात्मा फुले व्यायामशाळा येथे शिवछत्रपती पुरस्कार विजेते वसंत पाटील सोनवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगले पैलवान तयार झाले, आणि या लाल मातीने जन्माची भाकरी म्हणून १९८८ साली रेल्वेत नोकरी मिळाली. रेल्वे सिनियर टेक्निशियन फर्स्ट या हुद्द्यावर त्यांनी काम केले आहे.
दरम्यान त्यांच्या कुस्ती कालखंडात महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सलग दहा वेळा ५२ किलो वजन गटात त्यांनी सुवर्ण पदक कमावले आहे , शिवाय सिनियर नॅशनल स्पर्धेत पाच वेळा पदकाचे माणकरी ठरले आहेत. दिल्ली, जमशेदपुर, भिलवाडा, पिंपरी चिंचवड, सांगली याठिकाणी या स्पर्धा पै आनंदराव गायकवाड सरांनी खेळल्या आहेत. त्याचबरोबर ऑल इंडिया इंटरझोन दिल्ली, गोरखरपुर, मुखलसराई, वाराणसी, आग्रा, याठिकाणी ते लढले आहेत. अशा या महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या लढवय्या मल्लांस १९९० साली शासनाने शिवछत्रपती पुरस्कार जाहीर केला, व तो मानाचा शिवछत्रपती पुरस्कार १२ जून १९९२ साली पै आनंदराव गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.
रेल्वेत असताना अनेक वेळा रेल्वे इंटरझोन स्पर्धेत कोच म्हणून पै आनंदराव गायकवाड यांची नियुक्ती होती. शिवछत्रपती पुरस्कार विजेते कुस्ती कोच शिवाजीराव मस्के यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे.
मुंबईमधील अनेक कुस्ती मैदान ला आवर्जून उपस्थित असणारे आनंदराव गायकवाड नंबर एकच्या कुस्तीला पंच म्हणून त्यांची नियुक्ती असते.
रेल्वेची ३५ वर्षे सेवा केल्यानंतर त्यांची ३० डिसेंबर २०२३ रोजी सेवानिवृत्ती होत आहे *त्यानिमित्ताने 'कुस्ती हेच जीवन' कडुन त्यांच्या पुढील जीवनातील वाटचालीसाठी शुभेच्छा*....
---------------
धन्यवाद
पै संपत पाटील
*कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य*
उपाध्यक्ष शाहूवाडी तालुका...
Comments
Post a Comment