आनंदराव गायकवाड (फुपिरे) यांची रेल्वे सेवेतून सेवानिवृत्ती*.....
*आनंदराव गायकवाड (फुपिरे) यांची रेल्वे सेवेतून सेवानिवृत्ती*..... ------------------------------ फुपिरे गावचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते *पैलवान आनंदराव गायकवाड यांची रेल्वे सेवेतून ३० डिसेंबर रोजी सेवानिवृत्ती झाली आहे*. फुपिरे हे शिराळा तालुक्यातील गाव असून या गावात एक बिजली मल्ल म्हणून ज्यांची अजुनही ओळख आहे ते म्हणजे आनंदराव गायकवाड... लहानपणापासून कुस्तीची आवड, गावातच कुस्तीचा श्रीगणेशा केला आणि जेमतेम शिक्षण झाल्यावर मुंबईतील महात्मा फुले व्यायामशाळा येथे शिवछत्रपती पुरस्कार विजेते वसंत पाटील सोनवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगले पैलवान तयार झाले, आणि या लाल मातीने जन्माची भाकरी म्हणून १९८८ साली रेल्वेत नोकरी मिळाली. रेल्वे सिनियर टेक्निशियन फर्स्ट या हुद्द्यावर त्यांनी काम केले आहे. दरम्यान त्यांच्या कुस्ती कालखंडात महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सलग दहा वेळा ५२ किलो वजन गटात त्यांनी सुवर्ण पदक कमावले आहे , शिवाय सिनियर नॅशनल स्पर्धेत पाच वेळा पदकाचे माणकरी ठरले आहेत. दिल्ली, जमशेदपुर, भिलवाडा, पिंपरी ...