दोस्तितील राजामाणूस, आनंदराव पाटील*
*दोस्तितील राजामाणूस, आनंदराव पाटील*
............................................................................
शुभेच्छुक:- पै. मनोज मस्के (पत्रकार)
.............................................................................
दोस्तीतील राजा माणूस शित्तुर गावचे महान कुस्तीप्रेमी आणि सगळ्यांचे लाडके जिवलग मित्र मा. आनंदराव पाटील मिस्त्री असंख्य मित्रांचा ज्यांच्या सोबत साठा आहे व प्रत्येकाशी प्रेमाने वागणे हा त्यांचा स्वभाव आहे. अशा जिवाभावाच्या दोस्ताला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आज शेडगेवाडी परिसरातील व शाहुवाडी शिराळा भागात कुठे कुस्तीचे मैदान असेल तिथे अवर्जून आनंदराव मिस्त्रीं यांची हजेरी हमखास असते. कुस्ती आणि दोस्ती वारणा-मोरणाचे दुहेरी संगमा प्रमाणे ते टिकवतात, खरंतर दोस्ती करावी ती आनंदराव पाटील यांनीच कारण या मानसाच्या मनाला कुठेही चोरकप्पा नाही. जे असेल ते तोंडावर आणि स्पष्ट बोलणारा हा माणूस... माणूस म्हणून सर्वांना भावतो हे मात्र तितकंच खरं आहे. जवळपास हजार ते दोन हजार मित्रपरिवार त्यांनी या संपूर्ण भागात तयार केला. आणि तो सांभाळला ही मित्र करणं सोप आहे पण त्या मित्रांना सांभाळणं फार अवघड आहे. परंतु हे अवघड काम कसं सोप्या पद्धतीने करायचं याचं मात्र उत्तर आनंदराव पाटील यांच्याकडेच आहे.
मैदानाला आल्यानंतर शेवटी बसणारा, चुकीचे दिसताच उठून सांगणारा आणि नेहमी हसत मुख असणारे आनंदराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेडगेवाडी येथे मित्रपरिवारांनी कुस्ती स्पर्धा घेतले यातच या माणसाचे मोठेपण दिसून येते. येत्या 25 तारखेला आनंदराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेडगेवाडी येथील स्वामी समर्थ या हॉल वरती कुस्ती स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी शिराळा तालुक्यातील असंख्या पैलवान सहभागी होणार असल्याचे त्यांच्या मित्र परिवारांनी सांगितले.
रात्री अपरात्री कोणाचाही फोन वाजू दे आनंदरावांची मदत तात्पर असते. अनेक मित्र परिवारांना त्यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली, शिवाय अनेकांचे रोजगार त्यांनी स्वतःच्या खिशातील पैसे घालून उभा करून दिले, अनेक सामान्यातील सामान्याची कामे ते पुढे होऊन स्वत: करत असतात.
अशा या दोस्तील्या राजामाणसाला कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अणि असेच प्रेम राहो हिच सदिच्छा.
पै. मनोज मस्के (पत्रकार)
कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य
शिराळा तालुका अध्यक्ष
९८९०२९१०६५
Comments
Post a Comment