*संकटांवर मात करत प्रणाली पोलीस झाली आई- बापाच्या कष्टाचं चीज केलं*;

 *संकटांवर मात करत प्रणाली पोलीस झाली आई- बापाच्या कष्टाचं चीज केलं*;
*मनोजकुमार मस्के,मांगरूळ*:

 पोलीस किंव्हा सैन्य दलात भरती होण्यासाठी लाखो मुलं तयारी करतात.अत्यंत कठीण परिश्रम करूनही त्यात मोजकेच यशस्वी होतात. मात्र  शिराळा तालुक्यातील 'मांगरुळ' गावच्या प्रणाली मस्के हिने यश मिळवत मोलमजुरी करणाऱ्या आई -बापाचे पांग फेडले आहेत.
मांगरूळ गावचे सुरेश मस्के यांना दोन मुलं एक मुलगी आणि एक मुलगा. मोल मजुरी करून सुरेश यांनी मुलांना शिक्षण दिलं ऐवढच काय तर संपुर्ण विश्वास ठेवून मुलीला पाहीजे तो हट्ट पुरविले. आपल्या मुलगीने सरकारी नोकरी करावी अशी त्यांची मनातून इच्छा होती. त्यांचे हे स्वप्न त्यांच्या मुलीने पहिल्यांदा पूर्ण केले. मुलगी प्रणाली मस्के हिने खाकी वर्दी घालून सेवा देण्याचा निर्धार केला. मात्र मुख्य गावापासुन दिड किलोमिट शेतात राहत असलेल्या मांगरूळच्या खंड वस्तीपासून मुलीने पोलिस भरतीची तयारी करणे तितकं सोप्प नव्हतं. त्यातच तीने कब्बड्डी सारख्या खेळात नॅशनल पर्यंत मजल मारली
प्रणालीला आईची व वडीलांची साथ लाभली अन् ती मुंबई पोलीस दलात भरती झाली. ती मांगरूळ गावची दुसरी महिला पोलीस आहे.  
अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत कठीण परिश्रम करत प्रणालीने वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. पोलीस दलात दाखल झालो असलो तरी वरिष्ठ पदावर जाण्यासाठी तयारी सुरूच ठेवणार असल्याचे करूणा हीने पुण्यनगरीशी बोलतांना सांगितले. तर वडील सुरेश मस्के व आई सविता यांनी सांगितले की मोठे कष्ट करून मुलगी पोलीस झाली तीचा आई- बाप म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे.

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*