*वाकुर्डे बुद्रुक गावामध्ये डोळे तपासणीचे शिबिर संपन्न*

*वाकुर्डे बुद्रुक गावामध्ये  डोळे तपासणीचे शिबिर संपन्न*
मांगरूळ , दि . १ मे रोजी सद्गुरु मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट व नेत्रालय क्लिनिक कोल्हापूर यांच्या वतीने एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिनानिमित्त वैष्णवी कलेक्शन वाघवाडी फाटा श्री गणेश जाधव व श्री अशोक शिवाजी पाटील तात्या यांच्या संयुक्त विद्यमानाने वाकुर्डे बुद्रुक गावामध्ये मोफत डोळे तपासणीचे शिबिर अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडले.  यावेळी ग्रामस्थांचे मोफत डोळे तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले . या शिबिराचे उद्घाटन अशोक पाटील तात्या भीमराव पाटील शामराव शेटके यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या शिबिरामध्ये 200 हून अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला 60 पेक्षा जास्त लोकाना सवलतीच्या दरामध्ये चष्मे देण्यात आले तसेच पारूबाई जाधव, हिराबाई शेटके, येसाबाई माने, मुक्ताबाई माने ,दत्तू हरि जाधव ,दिनकर नाथा जाधव, हिराबाई तुकाराम जाधव सखुबाई बजरंग मानकर, यमाबाई नाना मादळे, रघुनाथ बाबू ढोले या रुग्णांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात आले. 
  वाकुर्डे बुद्रुक गावातील वाडी वस्तीवरील सर्व लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच या शिबिरासाठी कोल्हापूरची डॉक्टर रघुनाथ भालेकर, ऋतुजा भालेकर, नलिनी भालेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*