शिराळा तालुका शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्ष पदी चिखलीचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय कांबळे*
*शिराळा तालुका शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्ष पदी चिखलीचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय कांबळे* *संजय घोडे-पाटील* शिराळा तालुका शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख पदी चिखलीचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय कांबळे यांची नुकतीच निवड झाली आहे. त्याबद्दल श्री कांबळे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. श्री.कांबळे 'जनसेवा हीच ईश्वर सेवा' या उद्देशाने सामाजिक कार्य वैद्यकीय क्षेत्रात करीत आहेत. ते शिराळा येथील एका खाजगी दवाखान्यात एकूण 19 वर्षे काम करत आहेत. त्यांनी कोरोना महामारीच्या संकट काळात लोकांना अनेक स्तरावर मदत केलेली आहे. ऑक्सिजनची उपलब्धता, कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, रुग्णांची ने-आहन करणे, मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थ सहाय्य मिळवून देणे आदी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सेलमार्फत तालुक्यातील रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देणे कामी ही नियुक्ती करण्यात आली आहे.